मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dia Mirza Wedding Anniversary: मी दिया मिर्झा...; लग्नाच्या वेळी मराठी घेतली शपथ! व्हिडीओ व्हायरल

Dia Mirza Wedding Anniversary: मी दिया मिर्झा...; लग्नाच्या वेळी मराठी घेतली शपथ! व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 16, 2023 03:26 PM IST

Dia Mirza Wedding: दिर्या मिर्झाने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठीत शपथ घेतल्याचे दिसत आहे.

दिया मिर्झा
दिया मिर्झा (HT)

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून दिया मिर्झा ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने उद्योगपती वैभव रेखीशी दुसरे लग्न केले. काल त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने दियाने सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये दिया मराठीत शपथ घेताना दिसत आहे.

१५ फेब्रुवारी २०२३ रोजी दियाने सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते अग्निला साक्षी मानून सात फेरे घेताना दिसत आहेत. तसेच कागदावर हस्ताक्षर करत लग्न करत आहेत. त्यांच्या लग्नाला अदिती राव हैदरी देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान, दियाने लग्नाच्या कागदावर हस्ताक्षर करताना मराठीत शपथ घेतली आहे.
वाचा: करिष्माच्या दुसऱ्या लग्नाबाबत अशी होती रणधीर कपूर यांची प्रतिक्रिया

वैभवने इंग्रजी भाषेत शपथ घेतली आहे. तर दियाने, 'मी दिया मिर्झा शपथ घेते की, वैभव रेखी यांचे मी कायदेशीर पती म्हणून स्विकार करते' असे मराठी म्हटले आहे. दियाच्या तोंडून मराठी ऐकून सर्वांना आनंद झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर दियाचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी दियाच्या मराठी बोलण्याचंही कौतुक केले आहे. हा व्हिडीओ आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

IPL_Entry_Point

विभाग