मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Holi 2023: अमृता फडणवीसांनी लेकीसह व्हिडीओ शेअर करत होळीच्या दिल्या हटके शुभेच्छा

Holi 2023: अमृता फडणवीसांनी लेकीसह व्हिडीओ शेअर करत होळीच्या दिल्या हटके शुभेच्छा

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 07, 2023 09:40 PM IST

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस (HT)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. अमृता फडणवीस यांनी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेकीसोबत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघी होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दोघींच्याही चेहऱ्यावर रंग दिसत आहे. अमृता यांनी त्यांच्या मुलीचा हात हातात पकडला आहे. अमृता यांच्या खांद्यावर पोपटही बसून आहे. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
वाचा: आता गेलीस कि परत येऊ नकोस; अनिरुद्धच्या वक्तव्यावर कांचन संतापली

अमृता यांनी होळीचा हा व्हिडीओ शेअर करत “पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा” असे कॅप्शन दिले आहे. अमृता यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी मकर संक्रातीच्या शुभेच्छा देताना व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधील त्यांचे विचित्र मराठी बोलणे ऐकून अनेकांनी त्यांना सुनावले होते. तसेच त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

IPL_Entry_Point

विभाग