मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणची प्रकृती खालावली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणची प्रकृती खालावली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 27, 2022 09:37 PM IST

अभिनेत्रीदीपिका पादुकोणची (Deepika Padukone) तब्येत अचानक बिघडली आहे. त्यानंतर तिलामुंबईतील ब्रीच कँडीरुग्णालयात (breach candy hospital) दाखल करण्यात आले आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) तब्येत अचानक बिघडली आहे. त्यानंतर तिला मुंबईतील  ब्रीच  कँडी रुग्णालयात (breach candy hospital)  दाखल करण्यात आले आहे. दीपिकाला अस्वस्थ वाटू लागले होते तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रिपोर्टनुसार सोमवारी सायंकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तिच्या अनेक टेस्ट केल्या गेल्या. सध्या तिची तब्येत बरी असल्याचे सांगण्यात येत आहे.  दीपिकाच्या टीमशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

जवळपास एक महिन्यापूर्वी दीपिकाची तब्येत अचानक बिघडली होती. त्यावेळी तिचे हैदराबादमध्ये चित्रपट ’प्रोजेक्ट के’ याचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्यावेळी तिला हैदराबादमधील कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर एक दिवस उपचार करण्यात आले होते.

दीपिकाची तब्येत जेव्हा हैदराबादमध्ये खराब झाली होती त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने म्हटले होते की, हे तिचे रूटीन चेकअप आहे. याचे कारण होते की, ची कोविड -१९ मध्ये काही दिवसापूर्वीच बरी झाली होती. 

दिपीकाचे आगामी चित्रपट -


दीपिकाच्या आगामी चित्रपटामध्ये ‘पठान’ सामील आहे. त्यामध्ये शाहरुख खान व जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारी २०१३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. त्याचबरोबर दीपिका, ऋतिक रोशनबरोबर ‘फायटर’ आणि ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. 

 

IPL_Entry_Point