मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chhello Show: ही तर कॉपी! आरोपामुळे छेलो शो ऑस्करच्या शर्यतीतून पडू शकतो बाहेर

Chhello Show: ही तर कॉपी! आरोपामुळे छेलो शो ऑस्करच्या शर्यतीतून पडू शकतो बाहेर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 25, 2022 01:58 PM IST

Chhello Show: छेलो शो ऑस्करसाठी पाठवल्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने हा चित्रपट हॉलीवूड चित्रपटावर आधारीत असल्याचा आरोप केलाय.

छेल्लो शो अडचणीत, ऑस्करवारी संकटात?
छेल्लो शो अडचणीत, ऑस्करवारी संकटात? (HT_PRINT)

Chhello Show: ऑस्करसाठी भारतातून गुजराती छेलो शो याला नामांकन मिळालं आहे. दिग्दर्शक पॅन नलिन यांचा हा चित्रपट ऑस्करला पाठवल्याने वादही झाला. आता हा चित्रपट हॉलिवूडपटाची कॉपी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून चित्रपटाच्या ऑस्करवारीत अडथळा येण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात छेलो शो या चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री झाली असं सांगण्यात आलं होतं.

छेलो शोच्या आधी ऑस्करसाठी विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाइल्स, राजमौली यांचा आरआरआर या चित्रपटांच्या नावाचीही चर्चा होती. दरम्यान, छेलो शो ऑस्करसाठी पाठवल्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने हा चित्रपट हॉलीवूड चित्रपटावर आधारीत असल्याचा आरोप केलाय. तसंच एकाने हा चित्रपट म्हणजे सिनेमा पॅराडिसो या चित्रपटाची कॉपी असल्याचंही म्हटलं आहे.

छेलो शो हा जर सिनेमा पॅराडिसोवर या चित्रपटाची कॉपी असेल तर ऑस्करमधील पुढची वाटचाल इथेच थांबेल अशी शक्यता फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे. खरंच कॉपी असेल तर चित्रपटाचा प्रवास संपुष्टात येईल. त्यामुळे ऑस्करच्या पहिल्या फेरीतून चित्रपट बाहेर पडण्याची शक्यता आहे. ऑस्करसाठी जे चित्रपट पाठवण्यात येतात त्यासाठी महत्त्वाची आणि पहिली अटक असते ती म्हणजे चित्रपटांनी त्यांचा स्वत:चा विचार मांडला पाहिजे. इतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाची तो कॉपी असू नये.

भारताकडून याआधी गली बॉय हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला होता. तेव्हा हा चित्रपटही हॉलीवूडमधील चित्रपटाची कॉपी असल्याचं समोर आलं होतं. ८ एमएम या चित्रपटावर आधारित असल्यानं गली बॉय ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला होता.

छेलो शोवर एफडब्ल्युआयसीईने केलेल्या आरोपानंतर पुढे काय होणार हे पहावं लागेल. छेलो शो सिनेमा पॅराडिसोवर आधारित असल्याचा आरोप आहे. दरवर्षी भारताकडून फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून एक चित्रपट पाठवम्यात येतो. यावेळी गुजराती छेलो शोची निवड झाल्यानं उलट सुलट चर्चाही रंगल्या आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या