छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. नुकताच बिग बॉस १६च्या ट्रॉफीवर रॅपर एमसी स्टॅनने स्वत:चे नाव कोरले. आता एमसी स्टॅनने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकत नवा विक्रम केला आहे. काय आहे हा विक्रम जाणून घ्या...
एमसी स्टॅनचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्याला १८ लाख लोक फॉलो करत होते. बिग बॉस १६ जिंकल्यानंतर एमसी स्टॅन जवळपास १० मिनिटांसाठी इन्स्टाग्रामवर लाइव आला. त्यावेळी त्या लाइव्हमध्ये ५४१ हजार लोक होते. आजपर्यंत कोणत्याच भारतीय सेलिब्रिटीच्या लाइव्हला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत. यापूर्वी शाहरुख खानने विक्रम केला होता. जेव्हा शाहरुख इन्स्टावर लाइव्ह आला होता तेव्हा २५५ हजार व्ह्यूज मिळाले होते.
वाचा: आदित्य चोप्राच्या ‘त्या’ एका सल्ल्यानं हिट ठरला 'हम आपके हैं कौन'
एमसी स्टॅन इन्स्टाग्रामवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवणाऱ्या जगातील टॉप १० यादीमध्ये आला आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर बीटीएस आर्मी आहे. फेब्रुवारी महिन्यात बीटीएस आर्मीचे बीटीएस वी आणि जियोन जुंगकुक इन्स्टाग्रामवर लाइव्ह आले होते. तेव्हा ९२२ हजार व्ह्यूज त्यांना मिळाले होते.
संबंधित बातम्या