मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagyashree Birthday: फोटोंसाठी भाग्यश्रीला किस करायला सलमानने दिला होता नकार, काय आहे किस्सा?

Bhagyashree Birthday: फोटोंसाठी भाग्यश्रीला किस करायला सलमानने दिला होता नकार, काय आहे किस्सा?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 23, 2023 08:28 AM IST

Bhagyashree Birthday: मेने प्यार किया या चित्रपटाच्या वेळचा किस्सा भाग्यश्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

भाग्यश्री आणि सलमान
भाग्यश्री आणि सलमान (HT)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. मेने प्यार किया या पहिल्यावहिल्या चित्रपटातून भाग्यश्रीला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. आज २३ फेब्रुवारी रोजी भाग्यश्रीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही गोष्टी...

भाग्यश्रीची जन्म १२ फेब्रुवारी १९६९ रोजी सांगलीतील पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे राजे होते. एक-दोन मालिकांमध्ये काम केल्यानंतर भाग्यश्रीला १९८९ साली राजश्री प्रोडक्शनच्या 'मेने प्यार किया' चित्रपटात सलमान खान बरोबर मोठा ब्रेक मिळाला. भाग्यश्रीने २००१ साली बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. तिचे चित्रपट फार चालले नाहीत. मात्र, पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या वेळीच भाग्यश्रीला अनेक अनुभव आले.
वाचा: सई ताम्हणकरचा 'पॉंडीचेरी' चित्रपट पाहायचा? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

भाग्यश्रीने एका मुलाखतीमध्ये मेने प्यार किया चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला. 'त्यावेळी एका लोकप्रिय फोटोग्राफरला आमचे फोटो काढायचे होते. त्यांना सलमान आणि माझे हॉट फोटो हवे होते. त्यांनी सलमानला सांगितले होते की मी जेव्हा कॅमेरा सेट करेन तेव्हा तू भाग्यश्रीला किस कर. त्यावेळी आम्ही नवीन कलाकार असल्यामुळे फोटोग्राफरला असे काही करायचं स्वातंत्र्य आहे असा समज होता. सलमानने त्या फोटोग्राफरचा प्रस्ताव नकारला होता. असे काही करायचे असले तर पहिले भाग्यश्रीला विचारा असे स्पष्ट बोलला होता. त्या फोटोग्राफरला सलमानने दिलेले उत्तर मला खूप आवडलं. सलमानबद्दलचा आदर आणखी वाढला.' असे भाग्यश्री सलमानविषयी बोलताना म्हणाली होती.

त्यानंतर भाग्यश्रीने लग्न केले आणि इंडस्ट्रीला रामराम ठोकला. भाग्यश्रीला अभिमन्यू आणि अवंतिका अशी दोन मुले आहेत. भाग्यश्रीच्या मुलाने अभिमन्यूने 'मर्द को दर्द नही होता' या कॉमेडी सिनेमातून डेब्यू केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग