मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  AR Rahman : …म्हणून भारतीय चित्रपटांना ऑस्कर मिळत नाही; ए आर रेहमानचं बेधडक विधान

AR Rahman : …म्हणून भारतीय चित्रपटांना ऑस्कर मिळत नाही; ए आर रेहमानचं बेधडक विधान

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 17, 2023 10:44 AM IST

AR Rahman on Oscar award : आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळताच गायक ए आर रहमानने मोठा खुलासा केला आहे.

ए आर रहमान (PTI Photo)
ए आर रहमान (PTI Photo) (PTI)

फक्त बॉलिवूडच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय असलेला गायक आणि संगीतकार म्हणजे ए आर रहमान. नुकताच ए आर रहमानने ऑस्करबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारत नेहमी चुकीचे चित्रपट ऑस्करसाठी पाठवतो असे वक्तव्य केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ए आर रहमानने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, 'कधी कधी मी पाहातो की आपले चित्रपट ऑस्करच्या नॉमिनेशनमध्ये पोहोचतात पण ऑस्कर मिळवू शकत नाही. नेहमी ऑस्करसाठी भारताकडून चुकीचे चित्रपट पाठवले जातात. आपण नेहमी स्वत:ला वेगळ्या स्थानावर ठेवून हा विचार करायला हवा की नेमकं काय होतय. हे सगळं पाहण्यासाठी मला स्वत:ला जमिनीवर ठेवायला हवे.'

नाटू नाटू गाण्याला जेव्हा ऑस्कर मिळाला तेव्हा ए आर रहमानने मोठा खुलासा केला. नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे समोर आले.

नाटू नाटू गाण्यापूर्वी २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. जय हो हा एक ब्रिटीश चित्रपट होता. त्यामुळे नाटू नाटू हे हिंदी चित्रपटातील पहिले गाणे आहे ज्याला ऑस्कर मिळाला आहे. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे.

IPL_Entry_Point

विभाग