मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या टाळ्या!

Viral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या टाळ्या!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2023 09:17 AM IST

Anshula Kapoor Ramp Walk Video: लॅक्मे फॅशन वीक २०२३मध्ये अंशुला कपूरने तिच्या सुंदर आऊटफिटने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. तर, अंशुला रॅम्पवर येताच अर्जुनने तिला खूप प्रोत्साहन दिले.

Arjun And Anshula Kapoor
Arjun And Anshula Kapoor

Anshula Kapoor Ramp Walk Video: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या बहिणीने, अंशुला कपूर हिने लॅक्मे फॅशन वीक २०२३मध्ये आपल्या रॅम्पवॉकचा जलवा दाखवला. अंशुला कपूरने तिच्या सुंदर आऊटफिटने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. तर, बहीण अंशुला रॅम्पवर येताच भाऊ अर्जुनने तिला खूप प्रोत्साहन दिले. या खास क्षणांचा व्हिडीओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फॅशन वीकच्या स्टेजजवळ बसलेला अर्जुन कपूर त्याच्या धाकट्या बहिणीला रॅम्पवर चालताना पाहून खूप आनंदी दिसत होता.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या लहान बहिणीसाठी अर्जुनचा आनंद पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. भावाबहिणींचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अंदाज येईल की, या दोघांमधील बॉन्डिंग किती सुंदर आहे. दुसरीकडे, अंशुला देखील शिमरी टॉप आणि स्कर्टमध्ये खूप सुंदर दिसत होती. आपल्या बहिणीला रॅम्पवर चालताना पाहून अर्जुनला तिचा खूप अभिमान वाटला आहे. अंशुला स्टेजवर येताच टाळ्यांचा गडगडाट करून अर्जुनने तिला प्रोत्साहन दिलं. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हिरव्या रंगाच्या जॅकेट आणि डार्क पँटमध्ये दिसत होता. दुसरीकडे, अंशुला कपूर रॅम्पवर शिमरी कॉर्सेट आऊटफिटमध्ये दिसली होती. या रॅम्पवॉक दरम्यान ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडीओ पाहून अर्जुन आणि अंशुलाच्या या भाव-बहिणीच्या जोडीवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘दोघे खूप गोड आहे.’ आणखी एका युझरने कमेंट करत लिहिले की, त्यांना अर्जुनची स्टाईल खूप आवडली. काही लोक अंशुलाच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक करत आहेत.

देशातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट्सपैकी एक म्हणजे लॅक्मे फॅशन वीक! वर्षानुवर्षे हा वीक देशात नवनवीन फॅशन ट्रेण्ड सेट करण्यासाठी मदत करते. नेहमीच या इव्हेंटची प्रतीक्षा केली जाते. वर्षातून दोनदा हा सोहळा होतो. एफडीसीआय X लॅक्मे फॅशन वीक हा शानदार फॅशन सोहळा ९ मार्च ते १२ मार्च असा ४ दिवस चालेल आणि लॅक्मे अ‍ॅब्सोल्यूट ग्रँड फिनालेसह समाप्त होईल.

IPL_Entry_Point

विभाग