Malaika-Arjun Engagement: 'या' ठिकाणी होणार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा साखरपुडा
Malaika-Arjun: ट्रेड एक्सपर्ट उमैर संधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. अथिया शेट्टी-केएल राहुल, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अशा काही जोड्या लग्नबंधनात अडकल्या. अशात बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबतही चाहत्यांना अनेक प्रश्न आहेत. मलायका आणि अर्जुन यांनी कधीही आपलं नातं लपवून ठेवलं नाही. मात्र आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. आता त्या दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
ट्रेड एक्सपर्ट उमैर संधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले आहे. 'ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या आठवड्यात पॅरिस येथे साखरपुडा करणार आहेत' या आशयाचे ट्वीट केले आहे. पॅरिसमधील त्यांच्या साखरपुड्याला काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात ते लग्नाचे प्लानिंग करत आहेत.
वाचा: ‘कांतारा २’मध्ये दिसणार रजनीकांत? ऋषभ शेट्टीचा मोठा खुलासा
एकीकडे मलायका अर्जुनशी साखरपुडा करणार आहे तर दुसरीकडे मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानला भेटताना दिसते. मुलांसाठी ते सतत भेटताना दिसतात. अरबाज आणि मलायकाचे १९९८ साली लग्न झाले होते. मात्र सतत होणाऱ्या भांडणामुळे त्यांनी २०१७ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मलायका आता अर्जुनशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.