मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ, ट्रेलर शेअर करत म्हणाले...

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ, ट्रेलर शेअर करत म्हणाले...

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 04, 2022 03:06 PM IST

Amitabh Bachchan Post: अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन (HT)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतात. आता अमिताभ यांनी सोशल मीडियावर एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ते पाहून सर्वांना आनंद झाला आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 'आपडी थापडी' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत त्यांनी, 'T 4429 – रोहन विनायक माझ्या या अत्यंत प्रिय मित्राला आणि अतिशय सक्षम संगीत दिग्दर्शकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा…' या आशयाचे ट्वीट केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे हे ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.
वाचा: ए राम्या बजेटमध्ये राहायचं; श्रेयस तळपदेच्या 'आपडी थापडी'चा ट्रेलर प्रदर्शित

'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग