मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aishwarya Rai: ऐश्वर्या राय सोबत इंटिमेट सीन देताना...; रणबीर कपूरने सांगितला अनुभव

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय सोबत इंटिमेट सीन देताना...; रणबीर कपूरने सांगितला अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi
May 23, 2023 02:12 PM IST

Ranbir Kapoor: 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांनी इंटिमेट सीन दिला होता. हा सीन चर्चेत होता. पण ही सीन शूट करतानाचा अनुभव सांगितला होता.

Aishwarya Rai
Aishwarya Rai

बॉलिवूड ब्यूटी म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सतत चर्चेत असते. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती फार कमी इंटिमेट सीन्स देखील देते. एका चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत ऐश्वर्याने इंटिमेट सीन दिला होता. रणबीरने तो सीन शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे.

ऐश्वर्याने 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन शूट केला आहे. या सीनविषयी रणबीरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की ऐश्वर्याच्या गालाला हात लावणे देखील कठीण झाले होते. त्याचे हात कापत होते. तेव्हा ऐश्वर्याने त्याला समजावले होते की तू कामावर लक्ष दे आणि योग्य पद्धतीने सीन शूट कर. काही वेळानंतर रणबीरला देखील याची जाणीव झाली आणि त्याने शूटवर लक्ष केंद्रीत केले.

ए दिल है मुश्कील या चित्रपटातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायचा इंटिमेट सीन खूप व्हायरल झाला होता. अनेकांनी दोघांचेही कौतुक केले होते. मात्र या चित्रपटाच्या वेळच्या वक्तव्याने रणबीरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 'मला ही संधी पुन्हा मिळाली नसती' असे रणबीर कपूर म्हणाला होता. त्यावरुन अनेकांनी त्याला ट्रोल केले. अनेकांनी रणबीरचे हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले.

याच मुलाखतीमध्ये रणबीरने ऐश्वर्याचे कौतुक देखील केले. ऐश्वर्या एक कमालीची अभिनेत्री आहे आणि ती फॅमिली फ्रेंड आहे असे रणबीर म्हणाला होता. ए दिल है मुश्कील या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता आणि अनुष्का शर्मा महत्त्वाच्या भूमिका दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण चित्रपटाची चर्चा रंगली होती.

IPL_Entry_Point