मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वाह भाई वाह! 'भूलभुलैया २' च्या यशानंतर कार्तिक आर्यनला भेट मिळाली महागडी गाडी
कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन
24 June 2022, 17:24 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 17:24 IST
  • निर्माते या चित्रपटाच्या यशाने प्रचंड आनंदी आहेत. चित्रपटाच्या यशाचं संपूर्ण श्रेय कार्तिकला दिलं जातंय. त्यामुळेच अभिनेत्यावर खुश होत निर्मात्यांनी त्याला स्पेशल भेट दिली आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(kartik aaryan) याचा 'भूलभुलैया २' चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र कित्येक चित्रपटांना टक्कर देत 'भूलभुलैया २' अजूनही चित्रपटगृहात पाय रोवून उभा आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत कियारा आडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट २०० कोटींच्या घरात जाण्यापासून काही अंतर दूर आहे. मात्र निर्माते या चित्रपटाच्या यशाने प्रचंड आनंदी आहेत. चित्रपटाच्या यशाचं संपूर्ण श्रेय कार्तिकला दिलं जातंय. त्यामुळेच अभिनेत्यावर खुश होत निर्मात्यांनी त्याला स्पेशल भेट दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निर्मात्यांनी आनंदाने कार्तिकला एक महागडी गाडी भेट दिली आहे. 'भूलभुलैया २' चे निर्माते भूषण कुमार यांनी ही भेट दिली आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये कार्तिकने त्याचा निर्मात्यांसोबतचा आणि गाडीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ते दोघे गाडीच्या पुढे पोज देताना दिसतायत. ही काही साधी सुधी गाडी नसून ती Mclaren gt आहे जिची किंमत ३ कोटींहून जास्त आहे. ही पोस्ट शेअर करत कार्तिकने लिहिलं, 'चायनीज खाण्यासाठी नवीन टेबल मिळालं. मेहनतीचं फळ गॉड असतं ऐकलं होतं पण इतकं मोठं असतं हे माहित नव्हतं. इंडियातील पहिली Mclaren gt. पुढच्या वेळेस भेट म्हणून प्रायव्हेट जेट हवं सर.'

कार्तिकच्या या पोस्टवर कलाकारांसोबत चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालं असं म्हणत चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. यानंतर कार्तिक 'शहजादा', 'कॅप्टन इंडिया', 'सत्यनारायण की कथा' आणि 'फ्रेडी' मध्ये दिसणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग