Aamir Khan Dance In Nupur Ira Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिने ३ जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. यानंतर आता ही जोडी उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधीसह पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी नुपूर, आयरा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या उदयपूरमध्ये पोहोचले आहे. आयरा तिच्या सोशल मीडिया पेजवर लग्नाबाबतचे अपडेट्स सतत शेअर करत आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि किरण राव दोघेही नाचताना दिसले आहेत. आयराच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दोघेही राजस्थानी डान्सर्ससोबत ठेका धरताना दिसले आहेत.
या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि किरण राव राजस्थानी लोककलाकारांसोबत 'पीके' चित्रपटातील ‘थरकी छोकरो’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. ‘पीके’ चित्रपटातील हे गाणं आमिर खानवरच चित्रित झालं आहे. त्यामुळे यावेळी देखील आमिर खान गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला आहे. यावेळी आमिरने पांढरा कुर्ता आणि काळा पायजमा घातला आहे. तर, किरण राव काळी पँट आणि ग्रे टॉपसह कॅज्युअल लूकमध्ये दिसली आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरे ही जोडी आता शाही विवाह सोहळा करणार आहे. आयरा आपल्या लग्न सोहळ्याती काही खास क्षण इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत आहे. आयरा खानची जवळची मैत्रीण मिथिला पालकर देखील या फोटोंमध्ये दिसत आहे. नुकतेच आयराने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ऑफ शोल्डर वेलवेट ड्रेसमध्ये दिसली आहे. तर, तिचा नवरा नुपूर शिखरे हा काळ्या रंगाच्या थ्री पीस सूटमध्ये दिसला आहे.
आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला मुंबईत लग्न केले. आता ते विधीवत सात फेरे घेणार आहेत. त्यांचा हा शाही लग्नसोहळा ८ ते १० जानेवारी दरम्यान उदयपूरच्या ताज अरावली रिसॉर्टमध्ये होणार आहे. लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना कोणतीही भेटवस्तू आणू नये, असे सांगण्यात आले आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी रिसॉर्टमधील सर्व १७६ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या लग्न सोहळ्यासाठी आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, जुनैद खान, आझाद राव खान, मिथिला पालकर, इम्रान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन हे उदयपूरला पोहोचले आहेत.