मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: ईशाने साखरपुड्यासाठी खरेदी केला ३५ हजार रुपयांचा लेहंगा, कांचनला बसला धक्का

Aai Kuthe Kay Karte: ईशाने साखरपुड्यासाठी खरेदी केला ३५ हजार रुपयांचा लेहंगा, कांचनला बसला धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
May 09, 2023 04:09 PM IST

Aai Kuthe Kay Karte Update: 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. मात्र, ईशाला पैशांचा विचारही न करता खरेदी करताना पाहून अरुंधती आणि कांचनला धक्का बसतो.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ईशाच्या लग्नाला विरोध करणारा अनिरुद्ध आता मुलीच्या प्रेमाखातर तयार झाला आहे. देशमुख कुटुंबीय ईशाच्या साखरपुड्याची तयारी करत आहेत. ईशा, अरुंधती आणि कांचन या अनिशच्या कुटुंबीयांसोबत साखरपुड्याचे कपडे खरेदी करण्यास जातात. त्यावेळी ईशाने निवडेलेल्या ड्रेसची किंमत पाहून अरुंधती आणि कांचनला धक्का बसतो.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिशचे कुटुंबीय आणि ईशाचे कुटुंबीय साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी एका मोठ्या दुकानात गेल्याचे पाहायला मिळते. अरुंधती आणि कांचन तेथील महागड्या साड्या खरेदी करण्यास नकार देतात. ईशा मात्र मनासारखा घागरा घेते. तिला ३५ हजार रुपये किंमतीचा लेहंगा आवडतो.
वाचा: ‘द केरळ स्टोरी’ने जिंकली प्रेक्षकांची मने, जाणून घ्या कशी आहे कथा

ईशाने साखरपुड्यासाठी निवडलेल्या लेहंग्याची किंमत वाचून कांचन आणि अरुंधतीला धक्का बसतो. अरुंधती ईशाला समजावते की इतक्या महागाचे कपडे घेऊ नकोस. मात्र ईशा कोणाचं ऐकयला तयार नसते. शेवटी अनिशची आई ईशाची बाजू घेऊन तिला हवा तो लेहंगा घेऊ द्या असे सर्वांना बजावते. पण ईशाचे वागणे सर्वांनाच खटकत असते.

IPL_Entry_Point

विभाग