मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: आईच्या साडीत सुद्धा ईशाला जाणवते मायेची ऊब

Aai Kuthe Kay Karte: आईच्या साडीत सुद्धा ईशाला जाणवते मायेची ऊब

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2023 03:09 PM IST

Aai Kuthe Kay Karte Update: आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत ईशाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्याच वेळी ईशा थोडी भावूक झाली आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सर्वजण त्यांच्या साखरपुड्याच्या तयारीला लागले आहेत. ईशाने मनासारखी शॉपिंग केली आहे. अशातच अरुंधती तिचे राहिलेले कपडे देशमुखांच्या घरुन घेऊन जाते. त्यावेळी ईशा भावूक झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ईशा आणि अरुंधती बोलताना दिसत आहे. अरुंधती देशमुखांच्या घरी येते आणि तिच्या राहिलेल्या साड्या बॅगमध्ये भरुन घेऊन जाण्याची तयारी करते. ईशा तेथे समोरच बसलेली असते. त्यावेळी ती अरुंधतीला म्हणते, 'आई तू तुझ्या सगळ्या साड्या घेऊन नको ना जाऊस. मला झोप लागत नाही तेव्हा मी तुझी एखादी साडी कवटाळून घेऊन बसते. तेव्हा पटकन झोप लागते.'
वाचा: 'वाटतं तुला पकडून ओठांना kiss करावं', शोच्या निर्मात्यावर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप

ईशाचे बोलणे ऐकून अरुंधती भावूक होते. ती पून्हा बॅग उघडते आणि ईशाला तुला हवी ती साडी काढून घे असे इशाऱ्याने सांगते. ईशा देखील तिला हवी असलेली अरुंधतीची साडी काढून घेते आणि तिला मिठा मारते. सध्या ईशा आणि अरुंधतीमधील हा भावनिक ट्रॅक मालिकेत पाहायला मिळत आहे.

IPL_Entry_Point

विभाग