मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एकदिवस सेटवर बाबा आले आणि म्हणाले, 'डीसीपी चा ड्रेस अन् हवालदाराचा बॅच?'
मिलिंद गवळी
मिलिंद गवळी
24 June 2022, 13:31 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 13:31 IST
  • एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिलिंद यांच्या एसीपी असलेल्या वडिलांनी त्यांची मोठी चूक पकडली होती. जी त्यांच्या कधीही लक्षात आली नसती.

लोकप्रिय मराठी अभिनेते मिलिंद गवळी (milind gawali) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि निरनिराळे किस्से चहत्त्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टमधून जणू ते चाहत्यांसोबत बोलत असतात. आताही मिलिंद यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या सेटवर घडलेला एक किस्सा सांगितला आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिलिंद यांच्या एसीपी असलेल्या वडिलांनी त्यांची मोठी चूक पकडली होती. जी त्यांच्या कधीही लक्षात आली नसती. या घटनेचा एक व्हिडीओ देखील त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वडिलांच्या चूक दाखवून देण्याचा तो प्रसंग शेअर करत मिलिंद यांनी लिहिलं, 'स्वप्नांच्या दुनियेचं माझं स्वप्न “1975 मध्ये 15 ऑगस्ट ला “शोले” नावाचा पिक्चर रिलीज झाला .मिनर्व्हा थिएटरमध्ये तुडुंब गर्दी, त्या काळामध्ये ब्लॅक मध्ये तिकीट विकली जायची. शोले चे तिकीट मिळवून आणि तो सिनेमा मिनर्वा मध्येच बघायचंय, हे पण माझं स्वप्न होतं, जे काही आठवड्यानंतर माझ्या वडिलांनी ते पूर्ण केलं, असंख्य सिनेमे बघितले, सिनेमाशी निगडीत अशी असंख्य स्वप्न ही मी बघितली, (खरतर अजूनही बघतोच आहे) मी शाळेतच एक स्वप्न बघितलं होतं,आपण सिनेमामध्ये काम करायचं, दोन-तीन वर्षात “हम बच्चे हिंदुस्तान के” या चित्रपटात काम केले आणि ते ही स्वप्न पूर्ण झालं, त्यानंतर असंख्य सिनेमांमध्ये मी कामं केली, मग मी स्वप्न बघितलं, आपला स्वतःचा एक सिनेमा असावा,आपण तो बनवावा आणि “अथांग” नावाचा सिनेमा मी केला, त्यामुळे स्वप्न बघावीत, छोटी बघावित, मोठी बघावीत then focus on it and work hard for it,आणि थोडा वेळ द्यावा ,मग ती नक्कीच पूर्ण होतात.'

 

'अथांग सिनेमा बनवत असताना माझ्या घरची मंडळी कधीतरी सेटवर यायची, छान वाटायचं. एक दिवस माझे वडील जे रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ,मुंबई .श्री श्रीराम गवळी साहेब सेटवर आले आणि त्यादिवशी माझे मित्र कन्न आयर (जो डीसीपी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस चा रोल करत होता ) नेमका त्याचाच सीन शूट करत होतो, आमच्या ड्रेसमनने डीसीपी चा युनिफॉर्म आणून दिला,नेमका माझ्या वडिलांसमोर, पप्पांनी तो पाहिला आणि म्हणाले की हे सगळे बिल्ला /बॅचेस चुकीचे आहेत, डीसीपी चा ड्रेस आहे पण हवलदारचा बॅच / बिल्ला लावलेला आहे. खरंच आम्हाला कोणाला ते लक्षात आलं नव्हतं. खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे हिरो असतो. खरे आपल्या देशातले हिरो म्हणजे माझ्या वडिलांसारखेच असतात.' मिलिंद यांच्या या पोस्टवर नेटकरीही हसण्याचे ईमोजी पोस्ट करत आहेत.