मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: चक्कर येऊन पडलेल्या अरुंधतीच्या मदतीला धावणार आशुतोष; देशमुखांना धक्का

Aai Kuthe Kay Karte: चक्कर येऊन पडलेल्या अरुंधतीच्या मदतीला धावणार आशुतोष; देशमुखांना धक्का

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 24, 2022 01:11 PM IST

aai kuthe kay karte episode update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मध्ये पुन्हा एकदा अरुंधतीची तब्येत बिघडणार आहे. त्यामुळे ती राहत्या घरी चक्कर येऊन पडणार आहे.

आई कुठे काय करते
आई कुठे काय करते

aai kuthe kay karte latest update: 'आई कुठे काय करते' मालिकेत पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांचे सीन जास्त दाखवण्यात येत आहेत. अरुंधती आशुतोषच्या प्रेमात कशी पडेल यावर भर दिला जात आहे. मात्र अशातच अरुंधतीच्या तब्येतीवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाला नसताना अरुंधती वारंवार आपल्या तब्येतीकडे आणि दुखण्यांकडे दुर्लक्ष करत होती. मात्र आता हेच दुखणं तिच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. अरुंधती राहत्या घरी चक्कर येऊन पडणार आहे. आणि त्यात आशुतोष तिच्या मदतीला धावणार आहे.

आशुतोषच्या नव्या संगीत महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा ठेवण्यात येणार आहे. तिथे त्याने संपूर्ण देशमुख कुटुंबाला आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे. इथे देशमुखांच्या घरी सगळे नटून थटून तयार असताना यश त्यांना ही बातमी देणार आहे. तर दुसरीकडे अरुंधतीला कार्यक्रमात नेण्यासाठी आशुतोष स्वतः तिला घ्यायला येणार आहे. मात्र तो तिचं सौंदर्य पाहून पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडणार आहे. मात्र त्यानंतर अरुंधती तिच्या आजारपणामुळे राहत्या घरी चक्कर येऊन पडणार आहे. पुन्हा एकदा अरुंधतीचा आजार डोकं वर काढणार आहे.

त्यामुळेच पुढे सुलेखा ताई अरुंधतीची काळजी घेण्यासाठी तिच्या घरी राहण्यासाठी येणार आहे. तर दुसरीकडे अनिरुद्धची आईदेखील तिची काळजी घेण्यासाठी तिच्या घरी येणार आहे. आता पुढे नक्की काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

IPL_Entry_Point