मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs SRH Dream 11 : आज ट्रॅव्हिस हेडला कर्णधार बनवा, सोबत या ११ खेळाडूंना तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान द्या

RCB vs SRH Dream 11 : आज ट्रॅव्हिस हेडला कर्णधार बनवा, सोबत या ११ खेळाडूंना तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान द्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 25, 2024 02:54 PM IST

RCB vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येतील. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडतील.

RCB vs SRH Dream 11 Prediction आज ट्रॅव्हिस हेडला कर्णधार बनवा, सोबत या ११ खेळाडूंना तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान द्या
RCB vs SRH Dream 11 Prediction आज ट्रॅव्हिस हेडला कर्णधार बनवा, सोबत या ११ खेळाडूंना तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान द्या (AP)

आयपीएल २०२४ चा ४१ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मोसमातील या दोन संघांमधील ही दुसरी लढत असेल. यापूर्वी झालेल्या सामन्यात आरसीबी संघाला २५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 

त्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी भरपूर धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत आजचा सामनादेखील हाय स्कोअरिंग थ्रीलर होऊ शकतो, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

दरम्यान, हैदराबाद असो की बंगळुरू, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत, या सामन्यासाठी तुम्ही हेनरिक क्लासेनला तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात यष्टिरक्षक म्हणून समाविष्ट करू शकता. हेनरिक क्लासेनने या मोसमात आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केली आहे.

फलंदाज

फलंदाज म्हणून तुम्ही तुमच्या संघात विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश करू शकता. कोहली सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. 

दुसरीकडे अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्व गोलंदाजांचे टेन्शन वाढवले ​​आहे. फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केल्यास तोही मोठी खेळी खेळू शकतो.

अष्टपैलू खेळाडू

तुमच्या ड्रीम इलेव्हन टीममध्ये तुम्ही एडन मार्कराम, शाहबाज अहमद आणि विल जॅक यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करू शकता. हे खेळाडू बॉलसोबतच बॅटनेही चमत्कार करण्यासाठी ओळखले जातात. शाहबाज अहमदने नुकतीच अप्रतिम खेळी केली होती. 

गोलंदाज

त्याच वेळी, तुम्ही तुमच्या संघातील मुख्य गोलंदाज म्हणून पॅट कमिन्स, टी नटराजन आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करू शकता. पॅट कमिन्स आणि टी नटराजन चांगली गोलंदाजी करत आहेत. 

आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील या सामन्यासाठी तुम्ही ट्रॅव्हिस हेडला तुमच्या ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून निवडू शकता. उपकर्णधार म्हणून तुम्ही विराट कोहलीची निवड करू शकता. हे दोन्ही खेळाडू या मोसमात खूप धावा करत आहेत.

RCB vs SRH Dream 11 Prediction

यष्टिरक्षक - हेनरिक क्लासेन

फलंदाज – विराट कोहली (उपकर्णधार), फाफ डू प्लेसिस, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड (कर्णधार).

अष्टपैलू - एडन मार्कराम, शाहबाज अहमद, विल जॅक.

गोलंदाज - पॅट कमिन्स, टी नटराजन, मोहम्मद सिराज. 

IPL_Entry_Point