मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Navami Speech in Marathi : राम नवमीनिमित्त सुंदर मराठी भाषण, हे मुद्दे तुमच्यासाठी ठरतील उपयुक्त

Ram Navami Speech in Marathi : राम नवमीनिमित्त सुंदर मराठी भाषण, हे मुद्दे तुमच्यासाठी ठरतील उपयुक्त

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 17, 2024 12:46 PM IST

ram navami 2024 speech in marathi : रामनवमीचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकवेळा विद्यार्थ्यांना रामनवमीवर भाषण तयार करायला दिले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या शाळेत रामनवमीला भाषण देण्याची तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे.

Speech on Ram Navami : राम नवमीनिमित्त सुंदर मराठी भाषण, वाचा
Speech on Ram Navami : राम नवमीनिमित्त सुंदर मराठी भाषण, वाचा

रामनवमी हा भारतीय सनातन संस्कृतीचा एक पवित्र आणि पारंपारिक सण आहे जो भगवान विष्णूचा अवतार श्री राम यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी रामनवमी साजरी होते. हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. रामनवमी हा सण आपल्याला नेहमी सत्य, न्याय आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.

ट्रेंडिंग न्यूज

रामनवमीचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकवेळा विद्यार्थ्यांना रामनवमीवर भाषण तयार करायला दिले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या शाळेत रामनवमीला भाषण देण्याची तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. येथे आम्ही तुम्हाला रामनवमीवरील मराठी भाषणाचा एक नमुना सादर करणार आहोत.

शास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला होता. श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार होते. ज्यांनी राक्षसांना मारण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला होता.

भाषणाची सुरुवात अशी करा

आदरणीय पाहुणे, शिक्षक आणि माझे वर्गमित्र

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज राम नवमीच्या निमित्ताने मला या दिवसाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आजच्या दिवसाबद्दल आपल्या सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे.

रामनवमी हा सण भारतीय सनातन संस्कृतीचा एक अतिशय धार्मिक आणि पारंपारिक सण आहे, जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा धार्मिक सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो. धर्मग्रंथानुसार भगवान राम (भगवान विष्णूचा अवतार) यांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस रामजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवतांपैकी एक आहेत.

श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार होते. भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून जन्म घेतला. भारतात रामनवमी वर्षातून दोनदा साजरी केली जाते. पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी होणारी राम नवमी ही प्रभू रामाचा जन्म म्हणून साजरी केली जाते, तर शारदीय नवरात्रीमध्ये साजरी होणारी राम नामवी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते.

रामनवमीनिमित्त भाविक भगवान रामाची भक्तिभावाने पूजा करतात, उपवास करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. घरे आणि मंदिरे दिवे आणि फुलांनी सजविली जातात आणि भक्तिगीते आणि कीर्तने गायली जातात. यावेळी रामायण पठण आणि रामलीलाचे आयोजन करण्यात आले येते, जे या उत्सवाचे विशेष आकर्षण असते. रामनवमी हा सण सत्य, आचार आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. भगवान राम हे सर्व गुण आपल्या जीवनात मूर्त रूप देतात आणि आपल्याला शिकवतात की आपण अत्यंत कठीण परिस्थितीतही सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे.

भाषणाच्या शेवटी…

आजच्या या भाषणात आपण शिकलो की प्रभू राम हे केवळ एक धार्मिक पात्र नाहीत तर ते जीवन जगण्याच्या योग्य मार्गाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनात सत्य, नैतिकता, कर्तव्य, त्याग, प्रेम या गुणांचा समावेश होता. हे गुण आपल्या जीवनात आत्मसात करून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया. राम नवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

जय श्री राम!

WhatsApp channel

विभाग