इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ४० व्या सामन्यात आज (२४ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात निकराची लढत झाली. मात्र, अखेर दिल्लीने ४ धावांनी विजय मिळवला.
गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावा करायच्या होत्या. मुकेश कुमार गोलंदाजीला होता, तर फलंदाजीला राशीद खान होता. राशीदने पहिल्या २ चेंडूत २ चौकार मारले.
त्यानंतर गुजरातला ४ चेंडूत केवळ ११ धावा करायच्या होत्या. मात्र त्यानंतर राशिद खानला केवळ ६ धावा करता आल्या.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने २२० धावा केल्या. गुजरातकडून डेव्हिड मिलरने २३ चेंडूत ५५ धावा केल्या तर राशिद खानने ११ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या.
गुजरात टायटन्सला १३व्या षटकात १२१ धावांवर चौथा धक्का बसला. साई सुदर्शनने ३९ चेंडूंत ७ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. सध्या शाहरुख खान आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत. गुजरातला ४२ चेंडूत ९८ धावांची गरज आहे.
गुजरात टायटन्सला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात १३ धावांवर बसला. ॲनरिक नॉर्खियाने कर्णधार शुभमन गिलला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. त्याला ६ धावा करता आल्या. सध्या ऋद्धिमान साहा आणि साई सुदर्शन क्रीजवर आहेत. दोन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर २४ धावा आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ४ गडी गमावून २२४ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली. पंतने ४३ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ५ चौकार मारले. तर अक्षरने ४३ चेंडूत ६६ धावा केल्या.
दिल्लीने शेवटच्या ५ षटकात ९७ धावा केल्या आणि एक विकेट गमावली. २०व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोहित शर्माच्या षटकात पंतने ३१ धावा केल्या. या षटकात त्याने ४ षटकार मारले आणि एक चौकारही मारला.
एकवेळ दिल्लीने ४४ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर अक्षर पटेल आणि पंत यांच्यात ११३ धावांची भागीदारी झाली. अक्षर ६६ धावा करून बाद झाला. त्याचवेळी पंत आणि ट्रिस्टन स्टब्समध्ये १८ चेंडूत ६७ धावांची अखंड भागीदारी झाली. यामुळे दिल्लीने मोठी धावसंख्या उभारली आहे.
ऋषभ पंतने ३४ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १८वे अर्धशतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. १८ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा आहे. सध्या ऋषभ पंत ५७ धावांवर आणि ट्रिस्टन स्टब्स ५ धावांवर खेळत आहे. अक्षर पटेल ६६ धावा करून बाद झाला.
ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात ३८ चेंडूत ६१ धावांची भागीदारी आहे. 12 षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात १०५ धावा आहे. अक्षर पटेल २७ चेंडूत ३३ धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंत १८ चेंडूत ३० धावांवर खेळत आहे. पटेलने ३ चौकार आणि एक षटकार लगावला. तर पंतने ४ चौकार आणि १ षटकार मारला आहे.
सहाव्या षटकात दिल्ली संघाला तिसरा धक्का बसला. संदीप वॉरियरने शाई होपला रशीद खानकरवी झेलबाद केले. होपला ५ धावा करता आल्या. वॉरियरची हे तिसरी विकेट होती. यापूर्वी त्याने जेक फ्रेझर मॅकगर्क आणि पृथ्वी शॉ यांना बाद केले होते. पॉवरप्लेच्या ६ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ४४ धावा आहे. सध्या अक्षर पटेल आणि कर्णधार ऋषभ पंत क्रीजवर आहेत.
चौथ्या षटकात संदीप वारियरने दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. जॅक फ्रेझर मॅकगर्क षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तो १४ चेंडूत २३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीने ३५ धावांत पहिली विकेट गमावली.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवटिया, रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार शुभमन गिलने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. शुभमनचा हा १०० वा आयपीएल सामना आहे.
दिल्लीने सघाने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या जागी शाई होप आणि ललित यादवच्या जागी सुमित कुमारचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या