bengaluru viral news : झाडांना मिठी मारायची आहे? तर १५०० रुपये भरा! बंगळुरूच्या कंपनीचा अनोखा 'स्टार्टअप'-why this bengaluru company charges rs 1500 for hugging trees at cubbon park ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bengaluru viral news : झाडांना मिठी मारायची आहे? तर १५०० रुपये भरा! बंगळुरूच्या कंपनीचा अनोखा 'स्टार्टअप'

bengaluru viral news : झाडांना मिठी मारायची आहे? तर १५०० रुपये भरा! बंगळुरूच्या कंपनीचा अनोखा 'स्टार्टअप'

Apr 19, 2024 03:29 PM IST

bengaluru company charges rs 1500 for hugging trees : बंगळुरूच्या कब्बन पार्कमध्ये झाडांना मिठी मारण्यासाठी एका कंपनीने १५०० १५०० रुपयांत बुक करता येईल, अशी जाहिरात केली आहे. कंपनीची ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काही लोक याला 'फेक' देखील म्हणत आहेत.

झाडांना मिठी मारायची आहे? तर १५०० रुपये भरा! बंगळुरूच्या कंपनीचा अनोखा 'स्टार्टअप'
झाडांना मिठी मारायची आहे? तर १५०० रुपये भरा! बंगळुरूच्या कंपनीचा अनोखा 'स्टार्टअप'

bengaluru company charges rs 1500 for hugging trees : बेंगळुरूच्या कब्बन पार्कमध्ये झाडांना मिठी मारण्यासाठी १५०० रुपये आकारण्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. Trove Experience नावाच्या कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर "फॉरेस्ट बाथिंग एक्सपिरियन्स" हे अनोखे 'स्टार्टअप' लाँच केले आहे. त्यात असे म्हटले आहे की "जंगलांमध्ये उपचार करण्याची शक्ती आहे." त्यानुसार दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्यासाठी बेंगळुरू मधील या कंपनीने विशेष कार्यक्रम आयोजित केला असून या साठी ही जाहिरात दिली आहे. मात्र, ही जाहिरात सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

जाहिरातीत म्हटले आहे की कंपनीने आयोजित केलेल्या "फॉरेस्ट बाथिंग" या विशेष कार्यक्रमाचे तिकीट १५०० रुपयांना बुक केले जाऊ शकते. कंपनीची ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काही लोक ही जाहिरात बनावट असल्याचे म्हणत आहेत, तर काही नागरिकांनी याला भारतीय प्राचीन परंपरेतून पैसे कमवण्याचा चुकीचा मार्ग म्हटले आहे.

कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या अनोख्या 'स्टार्टअप' बद्दल माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार "फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरिअन्स" म्हणजेच 'झाडांना मिठी मारणे' यासह अनेक क्रियाकलापांचा समावेश आहे. कंपनीच्या जाहिरातीच्या या व्हायरल स्क्रीनशॉटनुसार, २८ एप्रिल रोजी होणाऱ्या या विशेष कार्यक्रमासाठी तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. याबद्दल एका सोशल मीडिया यूझरने या कंपनीच्या या जाहीरातीचा स्क्रीनशॉट शेअर केला असून या जाहीरातीला "घोटाळा" म्हटले आहे. व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे, "बाळांनो, जागे व्हा! एक नवीन घोटाळा बाजारात आला आहे."

Indian Navy new chief : नौदलाचे नवे प्रमुख डीके त्रिपाठी आहेत कोण? 'या' खास युद्ध कौशल्यासाठी आहेत प्रसिद्ध

ट्रोव्ह एक्सपीरियन्सच्या वेबसाइटवर या ऑफरबद्दल लिहिले आहे, "शहरातील आपले दैनंदिन जीवन खूप तणावपूर्ण असू शकते. निसर्गाशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी, सर्व गोंगाटात स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी समर्पित वेळ आणि जागा शोधणे. शिट्रिन योकू किंवा जंगलात आंघोळ करण्याची जपानी कला, जंगलात एक तीव्र, शांत आणि भावनिक मनशांती प्रदान करते. ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्न आणि तणावविरहित झाल्याचे वाटेल." आम्ही तुम्हाला सांगतो की "फारिस्ट बाथिंग" ही खरं तर "शिनरीन-योकू" नावाची जपानी परंपरा आहे. या अंतर्गत आपण निसर्गाच्या सानिध्यात विसावतो.

आता कंपनीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स कंपनीवर टीकाही करत आहेत. काही यूझर्सने निदर्शनास आणले आहे की बेंगळुरूचे कब्बन पार्क हे जंगल नाही आणि त्यात प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. "कबन पार्कमधील गवताला स्पर्श करणे देखील विनामूल्य आहे,"

Whats_app_banner