मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend News : एका शेअरमागे ६७ रुपये डिविडंड देतेय ‘ही’ कंपनी, तुमच्याकडं आहेत का शेअर?

Dividend News : एका शेअरमागे ६७ रुपये डिविडंड देतेय ‘ही’ कंपनी, तुमच्याकडं आहेत का शेअर?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 13, 2023 04:05 PM IST

TV Today Network Dividend News : तिमाहीचे निकाल आल्यामुळं आता कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना खूश करण्याची स्पर्धा लागली आहे.

Dividend Stock
Dividend Stock

TV Today Network Dividend News : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असली तरी अभ्यास, संयम आणि अनुभवाच्या आधारे इथं गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळू शकतो. हा परतावा शेअरच्या किंमतींमधील वाढीतूनच मिळतो असं नाही तर लाभांशाच्या रुपातही मिळतो. टीव्ही टूडे नेटवर्क या कंपनीच्या संयमी गुंतवणूकदारांना याचाच फायदा झाला आहे. 

टीव्ही टूडे नेटवर्क लिमिटेड या कंपनीनं नुकतीच लाभांश देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, ही कंपनी एका शेअरमागे तब्बल ६७ रुपये देणार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी आज शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यवहार करत आहे.

कंपनीनं नुकतीतच शेअर बाजाराला डिविडंडच्या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं प्रति शेअर ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीच्या शेअरवर ६७ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १३ फेब्रुवारी २०२३ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अपयश

कंपनीनं लाभांश जाहीर केला तेव्हा एका शेअरची किंमत २८५.२० रुपये इतकी होती. लाभांशाच्या घोषणेचा परिणाम काही प्रमाणात शेअरवर दिसला. काही दिवस शेअरचा भाव वाढून तो ३१५ रुपयांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर हा शेअर नफा वसुलीचा बळी ठरला आणि शेअरचा भाव थेट २३०.६५ रुपयांपर्यंत खाली आला. आज हा शेअर तब्बल २४.१३ टक्क्यांनी पडून २३०.८० रुपयांवर बंद झाला आहे.

WhatsApp channel

विभाग