मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates 25 November : महागाईत मोठा दिलासा! सहा महिन्यांपासून पेट्रोलचे दर 'जैसे थे'

Petrol Diesel rates 25 November : महागाईत मोठा दिलासा! सहा महिन्यांपासून पेट्रोलचे दर 'जैसे थे'

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 25, 2022 09:02 AM IST

'आम आदमी'ला महागाईत मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमती ८० डाॅलर्सच्या खाली गेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून, देशांतर्गत बाजारपेठेतही पेट्रोल डिझेलचे दर आज १८८ व्या दिवशी स्थिर आहेत.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel rates 25 November : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमती ८० डाॅलर्सच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतही पेट्रोल डिझेलचे दर आज स्थिर आहेत. डब्ल्यूटीआय ७७.९९ डाॅलर्सवर तर ब्रेंट क्रुड ८५ डाॅलर्स दरम्यान आहेत. या दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.खनिज तेलातील घसरणीनंतरही महाराष्ट्र आणि मेघालय वगळता देशाच्या विविध शहरांमध्ये १८८ व्या दिवशीही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलच्या किंमती १०६.३१ रुपये प्रति लीटर आहेत. डिझेल ९४.२७ रुपये प्रति लीटर आहेत. तर दुसरीकडे, महाराष्ट्राची सांस्कृतिक हब असलेल्या पुण्यात पेट्रोलच्या किंमती १०६.०१ तर डिझेल ९२.५३ रुपये प्रति लीटर आहेत.

देशाच्या विविध राज्यांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे -

 

शहर पेट्रोल (रु. प्रति लीटर)डिझेल (रु.प्रति लीटर)
अहमदाबाद९६.४२९२.१७
दिल्ली९६.७२८९.६२
देहरादून९५.२६९०.२८
भोपाळ१०८.६५९३.९
चेन्नई१०२.६३९४.२४
बेंगळूरु१०१.९४८७.८९
श्रीगंगानगर११३.४८९८.२४
परभणी१०९.४५९५.८५
जयपूर१०८.४८९३.७२

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग