Retail loan : कर्ज घेणाऱ्यांमध्ये तरुणांची टक्केवारी अधिक, डिजीटल प्रणालीचा प्रभाव अधिक
Retail loan : गेल्या काही महिन्यात रिटेल कर्ज घेणाऱ्यांमध्ये तरुण कर्जदारांचे प्रमाण अधिक आहे.डिजीटल प्रणालीचा प्रभाव यात अधिक जाणवत असल्याचे एका खाजगी सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
Retail loan : देशात रिटेल कर्जदारांच्या मागणीत वाढ झाल्याचे एका खाजगी सर्वेक्षणातून समोर आले आहे. सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कर्जाच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. उपभोगासाठी घेतल्या कर्जामुळे तसेच कर्जदारांमधील सकारात्मक वातावरणामुळे या वाढीस चालना मिळाली आणि कर्जाची कामगिरी वार्षिक पातळीवर सातत्याने वधारली.
ट्रेंडिंग न्यूज
सीएमआयमुळे भारताच्या कर्ज उद्योगाला रिटेल कर्ज क्षेत्राच्या परिस्थितीचा विश्वासार्ह आणि समकालीन मापदंड मिळाला आहे, जो सप्टेंबर २०२२ मध्ये १०० च्या पातळीवर पोहोचला. तरुण ग्राहकांमुळे मागणीस चालना मिळत असून कर्जपुरवठादार या ग्राहकांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करत आहेत. अद्ययावत सीएमआय अहवालानुसार पहिल्यांदाच १८ ते ३० वर्ष वयोगटातील ग्राहकांचा कर्जविषयक एकूण चौकशीमधील वाटा जास्त मोठा आहे. सप्टेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत ग्राहक नव्या कर्जासाठी अर्ज करत असल्याचे ते द्योतक आहे. या ट्रेंडला उपभोगावर आधारित कर्ज उत्पादने उदा. क्रेडिट कार्ड्स, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतले जाणारे कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांमुळे मोठी चालना मिळाली.ट्रान्सयुनियन सिबीलने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
डिजीटल प्रणालीमुळे मिळाला पाठिंबा
सप्टेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक मागणी मिळालेल्या कर्ज उत्पादनांमध्ये वैयक्तिक कर्ज व त्यापाठोपाठ क्रेडिट कार्डाचा क्रमांक लागला. वैयक्तिक कर्जासाठी होणाऱ्या चौकशीत वार्षिक पातळीवर १०९ टक्क्यांची वाढ झाली असून २०२१ मधील याच तिमाहीत विकास दर ९१ टक्के होता. क्रेडिट कार्डासाठी होणाऱ्या चौकशीचे प्रमाण एका वर्षाआधीच्या तिमाहीतील ३३ टक्क्यांच्या विकासदरावरून वार्षिक पातळीवर १०२ टक्क्यांनी वाढले.
उपभोगावर आधारित कर्ज उत्पादनांची मागणी व पुरवठा मूलतः डिजिटल आहे. कर्जपुरवठादार वेगाने डिजिटल प्रक्रियांचा अवलंब करून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत ग्राहकांना डिजिटल माध्यमांतून कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
संबंधित बातम्या
विभाग