मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : टाटाच्या या कंपनीच्या शेअर्सचे भाव जाणार १०८३ रुपये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Stocks to buy : टाटाच्या या कंपनीच्या शेअर्सचे भाव जाणार १०८३ रुपये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Mar 16, 2023 10:56 AM IST

Stocks to buy : मार्चमध्येच आता मे चा उकाडा सगळ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळेच टाटा समूहातील या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होऊ शकते. शेअर तज्ज्ञांनीही खरेदीचा सल्ला दिला आहे.

stocks to buy HT
stocks to buy HT

Stocks to buy : मार्चमध्येच आता मे चा उकाडा सगळ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळेच टाटा समूहातील या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होऊ शकते. शेअर तज्ज्ञांनीही खरेदीचा सल्ला दिला आहे. एसीच्या वाढत्या मागणीमुळे व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्येही चांगली वाढ होऊ शकते. व्होल्टासवर नोमूराने बाय रेटिंग कायम ठेवले आहे. त्यासाठी आता १०८३ रुपये टार्गेट प्राईस दिले आहे. बुधवारी व्होल्टास कंपनीचे शेअर्स ८७७.२५ रुपयांवर बंद झाले.

ट्रेंडिंग न्यूज

व्होल्टास शेअर प्राईस हिस्ट्री

व्होल्टासच्या शेअर्स प्राईस हिस्ट्री पाहिल्यास यावर्षीपासून आत्तापर्यंत या शेअर्सने ९ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. गेल्या पाच दिवसात ४ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या महिन्याभरात शेअर्समध्ये १.६७ टक्के रिटर्न्स दिले आहेत. १९९९ पासून आतापर्यंत व्होल्टास शेअर्सने ६४४६.६४ टक्के जबरदस्त परतावा दिला आहे.

खरेदी विक्री की होल्ड करावे शेअर्स

नोमूराशिवाय बीएनपी पारिबास सिक्युरिटीजने व्होल्टासचे टार्गेट प्राईस १००५ रुपये दिले आहे. त्याशिवाय एकूण ३८ तज्ज्ञांनी टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्सवर आपले मत व्यक्त केले आहे. ज्यांच्याकडे हा स्टाॅक आहे त्यांनी होल्ड करावा असे मत १३ विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग