Sahara India : सहाराच्या गुंतवणूकदारांना न्याय, ५००० कोटी रुपये परतफेडीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Sahara : सहारा समूहाद्वारे सेबीकडे जमा केलेले २४ हजार कोटी रुपयांपैकी गुंतवणूकदारांना ५ हजार कोटी रुपये परतफेडीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना हा आदेश दिला आहे.
Sahara : दर तुम्ही सहाराच्या स्टाॅकमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. वास्तविक सहारा समूहाद्वारे सेबीकडे जमा करण्यात आलेल्या २४ हजार कोटी रुपयांपैकील ५ हजार कोटी रुपयांची परतफेड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. केंद्र सरकारद्वारे सादर करण्यात आलेल्या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हे अदेश दिले आहे. याचिकेमध्ये सेबीजवळ सहारा समूहाचे जमा असलेले पैसे गुंतवणूकदारांना वाटण्यासाठी मंजूरी मागितली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर १.१ कोटी गुंतवणूकदारांना त्यांची अडकलेली गुंतवणूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खंडपीठाचे म्हणणे काय
न्यायाधीश एम आर शहा आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, गुंतवणूकदारांमध्ये याचे वितरण करण्यात यावे. संपूर्ण प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर सुभाष रेड्डी यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे.
६.५७ कोटी रुपयांची वसूली
मंगळवारी सेबीने सांगितले की, सहारा इंडिया रिअल इस्टेट काॅर्पोरेशनचे प्रमुख सुब्रतो राॅय आणि इतर जणांकडून अंदाजे ६.५७ कोटी रुपयांची वसूली बाकी आहे. कन्व्हरटेबल डिबेंचर जारी करण्यात येणाऱ्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सहाराच्या गुंतवणूकदारांना या शेअर्स धोक्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी सेबीने जून २०२२ मध्ये सहारा प्रमुख सुब्रतो राॅय सह इतर लोकांवर ६ कोटींचा भूर्दंड ठोठावण्यात आला होता. ज्याची परतफेड करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याची वसूली करण्यात आली.
संबंधित बातम्या