मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : रविवारी अनेक शहरांमध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर, येथे चेक करा लिस्ट

Petrol Diesel price today : रविवारी अनेक शहरांमध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर, येथे चेक करा लिस्ट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 21, 2023 08:19 AM IST

Petrol Diesel price today 21 May 2023 : रविवारी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. तुमच्या शहरातील इंधनाचे दर येथे तपासा.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 21 May 2023 : तेल कंपन्या दररोज राज्य आणि शहरांनुसार पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. आज म्हणजेच रविवारी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. कुठेतरी किमती वाढल्या तर कुठे कमी झाल्या, पण चार महानगरांमध्ये दर स्थिर आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमती शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात घसरल्या आहेत. कच्चे तेल प्रति बॅरल ७१.५५ डाॅलर्सवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ७५.५८ डाॅलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग