मराठी बातम्या  /  Business  /  Petrol Diesel Price Today 15 March 2023 Fuel Rates News In Marathi

Petrol Diesel price today : खनिज तेल किंमतीत चढ उतार, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर पहा

Petrol Diesel HT
Petrol Diesel HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Mar 15, 2023 08:08 AM IST

Petrol Diesel price today 15 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत आज किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Petrol Diesel price today 15 March 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये आज किंचीत वाढ झाली आहे. आज सकाळी सहा वाजता तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती ०.८६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डब्ल्यूटीआय क्रूड आॅईल ७१.९४ डाॅलर्स प्रती बॅरलवर होत्या. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ०.६८ टक्के वाढ झाली आहे.त्यामुळे या किंमती ७७.९८ डाॅलर्स प्रती बॅरल्सवर ट्रेड करत आहेत. खनिज तेलाच्या किंमतींमधील दर वाढीचा परिणाम देशातील अनेक शहरांमध्ये दिसत आहे. काही शहरांमध्ये किंमतीत वाढ झाली आहे.

या शहरांमध्ये झाली दरवाढ

चारही महानगरांपैकी चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. चेन्नईमध्ये आज पेट्रोल १०२.७४ रुपये आणि ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे. यात अनुक्रमे ११ पैसे तर झेल ९ पैसे प्रति लिटर दरवाढ नोंदवली आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोल १७ पैसे आणि डिझेल १७ पैसे प्रति लिटर ९६.७६ आणि ८९.९३ प्रति लीटरने विकले जात आहे. लखनऊमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि ८९.७६ रुपये प्रति लीटर १० पैशांनी आणि डिझेल १० पैशांनी महागले आहे. तर आज जयपूरमध्ये पेट्रोल ९८ पैसे आणि डिझेल ९० पैसे स्वस्त दराने १०८.४१ रुपये आणि ९३.६५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

संबंधित बातम्या

विभाग