मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : १३ रु.च्या शेअर्सचे बनले २२ लाख रुपये,तज्ज्ञ म्हणतात, ‘हा स्टाॅक खरेदी कराच’!

Multibagger stocks : १३ रु.च्या शेअर्सचे बनले २२ लाख रुपये,तज्ज्ञ म्हणतात, ‘हा स्टाॅक खरेदी कराच’!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 02, 2023 01:05 PM IST

Multibagger stocks : कोविड १९ दरम्यान २९ मे २०२० ला एनएसईवर या शेअर्सचे मूल्य अंदाजे १३.३५ रुपये होते. आता पूनावाला फिनकाॅर्पचे शेअर्स आता २९३ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत.

Multibagger stocks HT
Multibagger stocks HT

Multibagger stocks : शेअऱ बाजारात असे काही स्टाॅक्स आहेत की ज्यांनी कोविड १९ दरम्यान गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक स्टाॅक म्हणजे पूनावाला फिनकाॅर्प आहे. कोविड १९ दरम्यान २९ मे २०२० ला एनएसईवर या शेअर्सची किंमत अंदाजे १३.३५ रुपये होती. मात्र आता या शेअर्सची किंमत २९३ रुपयांच्या पातळीवर आहेत. या तुलनेत गुंतवणूकदारांना तीन वर्षात अंदाजे २१०० रुपये प्रति शेअर्सचा परतावा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

किती टक्के परतावा

पूनावाला फिनकाॅर्पच्या शेअर्सनी मागच्या एका वर्षात आपल्या शेअऱ होल्डर्सना अंदाजे ५ टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या दोन वर्षात हा मल्टिबॅगर स्टाॅक अंदाजे ११० रुपयांच्या पातळीवरुन वाढून २९३ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या दरम्यान शेअर्सनी तब्बल १६५ रुपयांचा परतावा दिला आहे. याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात पूनावाला फिनकाॅर्पच्या शेअर्सची किंमत अंदाजे १३.३५ रुपयांवरुन २९३ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.

गुंतवणूकीवर परिणाम

पूनावाला फिनकाॅर्पच्या शेअर्सप्रमाणे गुंतवणूक केलेल्या रकमेप्रमाणे गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे आज १.०५ लाख झाले आहेत . याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी दोन वर्षांपूर्वी या मल्टिबॅगरमध्ये १लाखांची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे मूल्य अंदाजे २.६५ लाख रुपये झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी केलेली १ लाखांची गुंतवणूक आज १.२२ लाख रुपये झाले असेल.

टार्गेट प्राईस

पूनावाला फिनकाॅर्पच्या शेअर्ससंदर्भात तज्ज्ञ बुलिश आहेत. हा शेअर्स दीर्घ काळ गुंतवणूक केल्यानंतर अंदाजे ४१७ रुपयांच्या पातळीवर जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअर्सची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी अंदाजे ३४३.८० रुपये आहे. तर निचांकी पातळी अंदाजे २०९.१५ रुपये प्रति शेअर्स आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग