मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sintex industry : २ रु. च्या शेअरमूल्य कंपनीची खरेदी करणार मुकेश अंबानी,करार रोखण्याची याचिका रद्द

Sintex industry : २ रु. च्या शेअरमूल्य कंपनीची खरेदी करणार मुकेश अंबानी,करार रोखण्याची याचिका रद्द

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 05, 2023 10:43 AM IST

Sintex industry : सिंटेक्स इंडस्ट्रीजची दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या कंपनीच्या खरेदीसाठीची बोली रिलायन्स इंडस्ट्री, असेस्ट केअर रिकन्स्ट्रक्शने जिंकली आहे.

Mukesh Ambani HT
Mukesh Ambani HT

Sintex industry : एनसीएलटीने सिंटेक्सचे माजी अध्यक्ष राहूल अरुणप्रसाद पटेल यांनी न्यायालयात सादर केलेली याचिका रद्दबातल ठरवली आहे. या याचिकेमध्ये पटेल यांनी कर्जात डुबलेल्या कंपनीच्या विरोधात दिवाळखोरी प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात आव्हान दिले होते.

काय म्हणणे होते एनसीएलटीचे

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी)च्या अहमदाबाद खंडपीठाचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. एनसीएलटीच्या या खंडपीठाने सहा एप्रिल २०२१ ला इंवेस्को असेस्ट मॅनेजमेंट (इंडिया) च्या याचिकेवर सुनावणी करताना सिंटेक्स इंडस्ट्रीविरोधात काॅर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले होते. एनसीएलटीच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची कोणतेही कारण मिळालेले नाही. त्यामुळे सहा एप्रिल २०२१ ला न्यायालयाने जारी केलेला आदेश कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, अपील रद्दबातल ठरवण्यात येत आहे.

मुकेश अंबानींनी जिंकली बोली

सिंटेक्स इंडस्ट्रीडसाठी काॅर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. या कंपनीला खरेदी करण्यासाठी मुकेश अबानी अग्रेसर होते. आणि अखेर त्यांनी ही बोली ९८.८८ टक्क्यांच्या फरकाने जिंकली आहे. गेल्या १० फेब्रुवारीला एनसीएलटीने या योजनेला मंजूरी दिली आहे.

शेअर्सचे मूल्य

सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे मूल्य बीएसईवर २.२१ रुपये आहे. मात्र २००८ मध्ये हे मूल्य अंदाजे २८० रुपये दराने विकले जात होते.आता त्यात अंदाजे ९९ टक्क्यांची घट दिसत आहे. या शेअर्सचे ट्रेडिंग सध्या बंद आहे. बीएसईवर Suspended due to Prodcedural reason असा मेसेज दाखवला जात आहे. कंपनीवर अंदाजे ७५०० कोटींचे कर्ज आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग