मराठी बातम्या  /  बिझनेस  /  TAX saving : ३१ मार्चपूर्वी करबचतीचे हे आहेत मार्ग, या टाॅप ५ योजना देतील करबचतीसह चांगला परतावा

TAX saving : ३१ मार्चपूर्वी करबचतीचे हे आहेत मार्ग, या टाॅप ५ योजना देतील करबचतीसह चांगला परतावा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 05, 2023 09:30 AM IST

TAX saving Schemes : जर तुम्ही ३१ मार्चपूर्वी कर बचतीचे मार्ग शोधत असाल, तसेच तुम्हाला चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. जाणून घ्या तुम्हाला किती फायदा आणि कसा मिळेल.

tax saving HT
tax saving HT

TAX saving Schemes : जर तुम्ही तुमच्या स्वकष्टार्जित मेहनतीचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.

३१ मार्चपूर्वी तुम्ही करबचतीचे पर्याय शोधत असाल तर या ५ योजना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. कारण या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्राप्तिकर अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला चांगला परतावाही मिळेल. अशा काही ५ कर बचत योजनांबद्दल संपूर्ण तपशील जाणून घ्या यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कर बचतीची संधी मिळू शकेल.

नॅशनल पेंन्शन स्कीम

नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीए) मध्ये जर तुम्ही योग्य वेळी त्यात गुंतवणूक केली तर तुमच्या म्हातारपणात तो मोठा आधार बनेल. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. सेवानिवृत्ती निधीचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची कर सूट मिळते. तसेच, कलम ८० सीसीडी (ई) अंतर्गत ५० हजार रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. या प्रकरणात, तुम्ही एकूण 2 लाख रुपयांच्या कमाल सवलतीचा लाभ घेऊ शकता.

पोस्ट आॅफिस स्कीम्स

केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ७.६० टक्के व्याज दिले जाते. तुम्ही तुमचे पैसे जास्तीत जास्त ५ वर्षांसाठी या योजनेत गुंतवू शकतात. तसेच, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट दिली जाते. यासोबतच चांगला परतावाही मिळतो.

पीपीएफ

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही देखील एक प्रकारची सरकारी योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही १५ वर्षांच्या कालावधीत उत्कृष्ट परताव्याचा लाभ घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे खाते उघडू शकता. या योजनेवर ७.१० टक्के व्याजदराचा लाभ उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही ५०० ते १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या सूटचा लाभही मिळतो.

ईएलएसएस

जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ईएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट मिळेल. यामध्ये तुम्हाला किमान ५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत ३ वर्षांसाठी गुंतवणूक करून तुम्ही १.५ लाख रुपयांपर्यंतचा कर बचतीचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला १० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतो.

वाॅलेंटरी पीएफ

तुम्ही वाॅलेंटरी भविष्य निर्वाह निधी योजनेतही गुंतवणूक करू शकता. मात्र, यामध्ये गुंतवणुकीला मर्यादा नाही. यामध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची वजावट मिळते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या मूळ पगाराच्या १००% रक्कम स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवू शकता. यातून तुम्हाला ८.१०% परतावा देईल, जो तुमचा सेवानिवृत्ती निधी म्हणून वापरला जाऊ शकतो.

WhatsApp channel

विभाग