मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mankind Pharma IPO : मॅनकाईंड फार्मा आयपीओवर गुंतवणूकदार खुश, आज होणार खुला

Mankind Pharma IPO : मॅनकाईंड फार्मा आयपीओवर गुंतवणूकदार खुश, आज होणार खुला

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 25, 2023 10:28 AM IST

Mankind Pharma IPO : मॅनकाईंड फार्मा कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूकदार चांगलेच खुश दिसत आहेत. कंपनीने ७७ फंड्सना १०८० रुपये प्रति शेअर्स प्रमाणे १.२ कोटी शेअर्स अलाॅट केले आहेत.

mankind IPO HT
mankind IPO HT

Mankind Pharma IPO : मॅनकाईंड फार्मा कंपनीच्या आयपीओला अँकर गुंतवणूकदारांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने ७७ फंड्सला १०८० रुपये प्रति शेअर्सप्रमाणे १.२ कोटी शेअर्स अलाॅट केले आहे. या अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी १२९८ कोटी रुपये जमवले आहेत. रिटेल सेक्शनसाठी हा आयपीओ आजपासून खुला होत आहे.

७७ गुंतवणूकदारांमध्ये कॅनडा पेंन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट्स, बोर्ड, गव्हर्मेंट आँफ सिंगापूरस माॅनेटरी अथाॅरिटी आँफ सिंगापूर, अबुधाबी, नोमूरा, माॅर्गन स्टेनले यांचा समावेश आहे. याशिवाय एचडीएफसी म्युच्युअल फंड्स, एसबीआय म्युच्युअल फंड्स, अॅक्सिस म्युच्युअल फंड्स, निप्पोन इंडिया म्युच्युअल फंड्स, आदित्य बिर्ला सन लाईफ सारख्या कंपन्यांनी मॅनकाईंड फार्मावर विश्वास दाखवला आहे.

रिटेल गुंतवणूकदार कधीपासून करु शकतील गुंतवणूक ?

रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ २५ एप्रिलला खुला होत आहे. गुंतवणूकदार २७ एप्रिलपर्यंत आयपीओला सबस्क्राईब्ड करु शकतील. मॅनकाईंड फार्मा शेअर्सचा प्राईस बँड १०२६ रुपये ते १०८० रुपये प्रती शेअर्स आहे. आयपीओची साईज ४३२६ कोटी रुपये आहे. हा आयपीओ संपूर्णपणे आॅफर फाॅर सेल अंतर्गत जारी करण्यात आला आहे.आयपीओमध्ये अर्धा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. तर ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी तर १५ टक्के नाॅन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

ग्रे मार्केटमधील स्थिती

ग्रे मार्केटमध्ये मॅनकाईंड फार्मा कंपनीचे शेअर्स आज ९० रुपये प्रिमियमवर उपलब्ध आहेत. कालच्या तुलनेत किंमत १५ रुपयांनी अधिक आहे. सोमवारी मॅनकाईंडचा जीएमपी ७५ रुपये होता. शेअर बाजारात या आयपीओची लिस्टिंग ८ मे ला होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग