मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy : एसबीआय, विप्रो, फेडरल बँकसह हे ८ स्टाॅक्स आहेत आजचे मल्टिबॅगर्स, लक्ष ठेवाच !

stocks to buy : एसबीआय, विप्रो, फेडरल बँकसह हे ८ स्टाॅक्स आहेत आजचे मल्टिबॅगर्स, लक्ष ठेवाच !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 25, 2023 09:46 AM IST

stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये एसबीआय, विप्रो, फेडरल बँकेसारख्या आठ स्टाँक्समध्ये तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. या किंमतींमध्ये शेअर्सची खरेदी करावी अथवा विक्री ? त्यासह स्टाॅप लाँस किती ठेवावा हे जाणून घ्या.

stocks to buy HT
stocks to buy HT

stocks to buy : सोमवारी शेअर बाजारात तेजी कायम राहिली. सेन्सेक्समध्ये ४०१ अंशांची उसळी घेत ६० हजारांच्या अंश पातळीपातळी पार केली. अमेरिकन शेअर बाजारातही संमिश्र स्थिती होती. डाऊ जोन्स ६६ अंश वर ३३८७५ आणि एस अँड पी ३ अंश वाढीसह ४१३७ च्या पातळीवर बंद झाला. अशा परिस्थितीत आज इंट्रा डे मध्ये स्टाॅक तज्ज्ञांनी ८ स्टाॅक्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

शेअर विश्लेषक तज्ज्ञांच्या मते, एलआयसी हाऊसिंग फायनान्सला ३३८ रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या शेअर्ससाठी ३५० रुपये टार्गेट प्राईस आणि स्टाॅप लाॅस ३३१ रुपयांचा दिला आहे. दुसऱ्या स्टाॅक्समध्ये एसबीआयला ५५४ रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्ससाठी ५५४ टार्गेट दिले असून ५७० रुपयांचा स्टाॅप लाॅस लावण्यास सांगितले आहे.

विप्रो शेअर्स सध्याच्या किंमतींवर खरेदी करुन टार्गेट प्राईस ४०० रुपये आणि स्टाॅप लाॅस ३६४ रुपये दिले आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक स्टाॅक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टाॅक्ससाठी ९४५ टार्गेट ठेवून स्टाॅप लाॅस ८७८ रुपयांचा ठेवावा असे सुचित करण्यात आले आहे.

जेएसडब्ल्यू स्टीलला ७२० रुपयांवर खऱेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्सचे टार्गेट प्राईस आज ४५ रुपये आणि स्टाॅप लाॅस ७०५ रुपये ठेवण्यात आले आहेत. याशिवाय तुम्ही ग्रासीम इंडस्ट्री शेअर्सला १६९० रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. यासाठी लक्ष्य १७२५ रुपये आणि स्टाॅप लाँस १६६० रुपये ठेवण्यात आले आहेत.

शेअर तज्ज्ञांच्या मते, मंगळवारी सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना घेता येईल. बीएचईएल शेअर्स ७६.५५ रुपयांवर खरेदी करुन लक्ष्य ७९.९० रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्टाॅप लाॅस ७४.९० रुपये ठेवण्यात आला आहे. फेडरल बँक १३२ रुपयांवर खरेदी केल्यानंतर त्यासाठी अंदाजे १३६.४० रुपये लक्ष्य ठेवावे आणि स्टाॅप लाँस १३०.४० रुपये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग