मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual fund : पायाभूत क्षेत्रातील हा आहे टाॅप रेडेट म्युच्युअल फंड, दिला तब्बल १४.४६% परतावा

Mutual fund : पायाभूत क्षेत्रातील हा आहे टाॅप रेडेट म्युच्युअल फंड, दिला तब्बल १४.४६% परतावा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 29, 2023 12:34 PM IST

Mutual fund : म्युच्युअल फंडामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामध्ये क्षेत्र-आधारित योजना देखील आहेत. त्यात इन्फ्रा, फार्मा, बँकिंग आणि फायनान्शिअल इ. चा प्रामुख्याने समावेश होतो. येथे आम्‍ही तुम्‍हाला पायाभूत सुविधा क्षेत्राच्‍या सर्वोत्‍तम योजनेची माहिती देणार आहोत.

Mutual funds HT
Mutual funds HT

ICICI Mutual fund : म्युच्युअल फंडामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामध्ये क्षेत्र-आधारित योजना देखील आहेत. त्यात इन्फ्रा, फार्मा, बँकिंग आणि फायनान्शिअल इ. चा प्रामुख्याने समावेश होतो. येथे आम्‍ही तुम्‍हाला पायाभूत सुविधा क्षेत्राच्‍या सर्वोत्‍तम योजनेची माहिती देणार आहोत, या योजनेने मागील एका वर्षात सर्वाधिक परतावा दिला आहे. ही योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, हा प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊसचा टॉप रेटेड सेक्टरल फंड आहे.

टाॅप रेटेड फंड

या फंडाने सरासरीपेक्षा जास्त परतावा दिला आहे आणि वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एसआयपी योजनांपैकी एक आहे. तसेच, फंडाला व्हॅल्यू रिसर्च सारख्या टाॅप एजन्सीकडून सर्वोच्च रेटिंग आहे.

इतके टक्के दिला रिटर्न्स

आयसीआय़सीआय़ प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये ३ वर्षांसाठी १० हजार रुपयांची अपफ्रंट गुंतवणूक आणि त्यानंतर १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीने सध्या ६.४० लाख रुपयांचा निधी तयार केला आहे. ३ वर्षात एकूण गुंतवणूक रु.३.७० लाख झाली असती. परंतु ३८% वार्षिक परताव्यानुसार, गुंतवणूकीची एकूण रक्कम ६.४० लाख रुपये झाली असती.

फंडाने गेल्या काही वर्षांत एसआयपीवर चांगला परतावा दिला आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की भविष्यात परताव्याची हमी आहे. ही एक इक्विटी योजना आहे, ज्यावरील परतावा शेअर बाजाराच्या स्थितीच्या अधीन आहे. स्टॉक मार्केटच्या परिस्थितीनुसार फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

ह्या बाबी ध्यानात ठेवा

फंडाने गेल्या काही वर्षांत एसआयपीवर चांगला परतावा दिला आहे. तथापि भविष्यातील परताव्याची हमी नाही. ही एक इक्विटी योजना आहे, त्यामुळे यावरील परतावा शेअर बाजाराच्या स्थितीशी निगडित आहे. स्टॉक मार्केटच्या परिस्थितीनुसार फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

या फंडाने १ वर्षात २२.३१% वार्षिक परतावा दिला आहे, जो त्याच गुंतवणुकीच्या कालावधीत ११% च्या श्रेणी सरासरी परताव्यापेक्षा जास्त आहे .गेल्या २ वर्षात ३६.७८%, ३ वर्षात २५.३९% आणि ५ वर्षात १२.८३% वार्षिक परतावा दिला आहे. १ वर्ष, २ वर्षे आणि ३ वर्षांमध्ये श्रेणी सरासरी परताव्याच्या तुलनेत या फंडाने जास्त परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलने दाखल झाल्यापासून आतापर्यंत समकालीन फंडांच्या वार्षिक सरासरी १३.४७% च्या तुलनेत अंदाजे १४.४६% वार्षिक परतावा दिला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग