मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual funds : ELSS फंडातील गुंतवणूक देते दुहेरी फायदा; कर सवलतीसह चांगल्या रिटर्न्सची हमी

Mutual funds : ELSS फंडातील गुंतवणूक देते दुहेरी फायदा; कर सवलतीसह चांगल्या रिटर्न्सची हमी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 23, 2023 12:11 PM IST

ELSS Mutual funds : ईएलएसएस (ELSS) योजना ही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना म्हणूनही ओळखली जाते. जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल, तर म्युच्युअल फंडाची ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

mutual funds
mutual funds

Mutual funds : गुंतवणुकीच्या बाबतीत दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि दुसरी म्हणजे तुम्हाला कर सूट मिळेल. तुम्हाला हे दोन्ही फायदे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ELSS) द्वारे मिळू शकतात.

ईएलएसएस हा इक्विटी आधारित म्युच्युअल फंड आहे. यामध्ये ८० टक्के गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये आणि २० टक्के डेब्टमध्ये केली जाते. या योजनेत, तुम्हाला कलम ८० सीअंतर्गत चांगल्या परताव्यासह अदाजे १.५० लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ मिळतो. बरेच लोक या योजनेला टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना असेही म्हणतात. जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल, तर म्युच्युअल फंडाची ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे येथे जाणून घ्या.

आवडीची स्कीम निवडण्याची संधी 

ईएलएससमध्ये गुंतवणुकीसाठी फक्त ५०० रुपयांपासून सुरू करता येते. मात्र कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही. यासाठी किमान लॉक-इन कालावधी ३ वर्षांचा आहे. यासोबतच तुम्हाला तुमच्या आवडीची स्कीम निवडण्याची संधी मिळते. म्हणजेच तुम्ही तुमच्या बजेट आणि सोयीनुसार स्कीम निवडू शकता.

एसआयपीचा पर्यायही खुला

इक्विटी लिंक्ड बचत योजनांमध्ये, तुम्ही एकरकमी पैसे जमा करू शकता किंवा तुम्ही एसआयपीचा पर्यायही निवडता येतात. एसआयपीद्वारे, तुम्ही त्यात ठराविक अंतराने ठराविक रक्कम गुंतवता येते. एसआयपीची रक्कम किमान ५०० रुपयांची असू शकते. एकरकमी गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

३ वर्षांचा लॉक इन कालावधी

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमचा लॉक-इन कालावधी फक्त तीन वर्षांचा असतो. म्हणजेच तीन वर्षांपर्यंत गुंतवणूकदाराला त्यातून पैसे काढता येत नाहीत. पण तीन वर्षांनंतर तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता. एखाद्या गुंतवणूकदाराने लाभांशाचा पर्याय निवडल्यास, ३ वर्षांच्या लॉक-इन कालावधीतही त्याला वार्षिक आधारावर लाभांशाचा लाभ मिळेल.

ईएलएसएसवर दीर्घकालीन भांडवली नफा १ लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. यापलीकडे, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के दराने कर आकारला जातो. याशिवाय उपकर आणि अधिभार भरावा लागतो. त्याच वेळी, गुंतवणूकदाराला मिळालेला लाभांश करमुक्त राहतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग