मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani hidenberg ; अहवालामागचे नेमके सत्य काय ? नफा कमावण्यासाठी हिडेनबर्गने केला हा प्रयत्न

Adani hidenberg ; अहवालामागचे नेमके सत्य काय ? नफा कमावण्यासाठी हिडेनबर्गने केला हा प्रयत्न

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 31, 2023 12:14 PM IST

Adani hidenberg : अदानी समुहासंदर्भात हिडेनबर्गने जाहीर केलेल्या अहवालातील टायमिंग आणि त्याचा नेमका उद्देश यावरच आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअर्समधून जबरदस्त नफा कमावण्याच्या उद्देशाने हा अहवाल तयार गेला का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

adani Group HT
adani Group HT

Adani hidenberg : अदानी समुहासंदर्भात हिडेनबर्गने जाहीर केलेल्या अहवालातील टायमिंग आणि त्याचा नेमका उद्देश यावरच आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअर्समधून जबरदस्त नफा कमावण्याच्या उद्देशाने हा अहवाल तयार गेला का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिडेनबर्गचा अहवाल एक आठवड्यापूर्वी जाहीर झाला होता. पण गेल्या आठवड्यात शेअर बाजारात या वृत्ताने अदानी समुहाला आणि शेअर बाजाराला हादरुन सोडले. २४ जानेवारीला जाहीर झालेल्या अहवालानंतर अदानी समुहाच्या सात लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स कोसळले. जगातील अब्जाधीशांच्या यादीतील गौतम अदानींचा क्रमांकही ढासळला. अदानी समुहाने हिडेनबर्गच्या आरोपांचे खंडन करत ४१६ पानांचे उत्तर दिले. यानंतर पुन्हा हिडेनबर्गनेही पलटवार केला. या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यात हिडेनबर्गच्या अहवालाचे टायमिंग आणि त्याचा हेतू यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हिडेनबर्गच्या अहवालाचा उद्देश हा नफाखोरी आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय.

शाॅर्ट पोझीशनवर प्रश्नचिन्ह

वास्तविक, हिडेनबर्गने आपल्या अहवालात खुलासा करताना म्हटले आहे की, त्यांनी अदानी समुहाच्या शेअर्समध्ये शाॅर्ट सेलिंग पोझीशन घेतली आहे. अमेरिकेतील गुंतवणूक फर्मच्या डिस्क्लेमरनुसार, हिडेनबर्गचा शाॅर्ट सेलिंगचा धंदा आहे. याचाच अर्थ बाजारातील घसरत्या मूल्याचा फायदा ही कंपनी घेते. शेअर्सची विक्री पहिल्यांदा केली जाते आणि त्यानंतर जेंव्हा शेअर मूल्य घसरते तेंव्हा ते शेअर्स पुन्हा खरेदी केले जातात. हिडेनबर्गच्या अहवालात तसा स्पष्ट उल्लेख केला आहे. अदानी समुहाच्या शेअर्समध्ये हिडेनबर्गने शाॅर्ट पोझीशन घेतल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच अदानी समुहाचे शेअर्स गडगडले तर त्याचा फायदा हिडेनबर्गला होणार आहे.

हे संपूर्ण प्रकरण काॅन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्टचे आहे. शेअर तज्ज्ञांच्या मते, या अहवालामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. याचा हिडेनबर्गला थेट फायदा होणार आहे. दुसरीकडे हा अहवाल अदानी समुहाचा एफपीओ जाहीर होण्याच्या वेळीच प्रकाश झोतात आला आहे. या एफपीओतून अदानी समुहाला २० हजार कोटी रुपये जमा करायचे आहेत. या रिपोर्टमुळे एफपीओ आॅफरिंगला झटका बसला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या