मराठी बातम्या  /  बिझनेस  /  adani haifa port : 'हिंडनबर्ग'च्या रिपोर्टनंतरही 'अदानी' सुस्साट! इस्राइलचं हैफा बंदर ताब्यात घेणार

adani haifa port : 'हिंडनबर्ग'च्या रिपोर्टनंतरही 'अदानी' सुस्साट! इस्राइलचं हैफा बंदर ताब्यात घेणार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 30, 2023 07:53 PM IST

Adani purchased haifa port : अदानी समूहातर्फे इस्रायलमधील हैफा हे बंदर विकत घेण्यात आले आहे. या बंदराच्या अधिग्रहण समासंभास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू उपस्थित राहणार आहेत. इस्रायलमधील ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असणार आहे.

Gautam Adani HT
Gautam Adani HT

Adani purchased haifa port : अदानी समुहातर्फे इस्रायलमधील हैफा हे बंदर विकत घेण्यात आले आहे. या बंदराच्या अधिग्रहण समासंभास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू उपस्थित राहणार आहेत. इस्रायलमधील ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक असणार आहे.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) आणि इस्रायलच्या गॅडोट ग्रुप यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये इस्रायलमधील हैफा बंदराचे खासगीकरण करण्यासाठीची तब्बल १.१८ अब्ज डॉलरची निविदा जिंकली होती. या वर्षी ११ जानेवारी रोजी खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर बंदरात अपग्रेडेशनचे काम जोरात सुरू आहे. यामध्ये अदानींकडे ७० टक्के तर गॅडोट ग्रूपकडे ३० टक्के हिस्सा आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे मंगळवारी हैफा पोर्ट टेम्पररी क्रूझ टर्मिनल येथे समारंभास उपस्थित राहणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

इस्त्रायलमधील दुसरे मोठे बंदर

हैफा बंदर हे इस्रायलमधील शिपिंग कंटेनर्सच्या बाबतीत दुसरे सर्वात मोठे बंदर आहे आणि पर्यटक क्रूझ जहाजांच्या शिपिंगमध्ये सर्वात मोठे आहे. अदानांची कंपनी भारतात १३ सागरी बंदरांचा कारभार चालवते आणि भारताच्या २४ टक्के सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवते. पश्चिमेकडील देशांमध्ये या कंपनीची आतापर्यंत कोणतीही गुंतवणूक झालेली नाही. त्यामुळे इस्त्रायलमध्ये या अदानी पोर्ट्सचा प्रवेश हा आशिया आणि युरोपमधील सागरी वाहतूक वाढीसाठी आणि भूमध्यसागरीय हबसाठी महत्त्वाचा असणारा आहे.

अदानीच्या निमित्ताने आणखी भारतीय कंपन्या इस्रायलमध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त होतील, विशेषत: अक्षय ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात ही गुंतवणूक होईल, अशी आशा इस्रायलने व्यक्त केली आहे. इस्त्रायली संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भारतामध्ये ड्रोन निर्मिती सुविधा उभारण्यासाठी अदानी समूह सध्या कार्यरत आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकी संस्थेने केलेल्या आरोपांमुळे अदानी समूह सध्या अडचणीत आलेला आहे. यातच अदानींचा हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा समारंभ आयोजित होत असल्याने त्याबाबत औत्सुक्य व्यक्त होत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग