मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Economic Survey : देशाची आर्थिक प्रकृती कशी आहे?; आज येणार आर्थिक पाहणी अहवाल, 'असा' पाहा Live

Economic Survey : देशाची आर्थिक प्रकृती कशी आहे?; आज येणार आर्थिक पाहणी अहवाल, 'असा' पाहा Live

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 31, 2023 11:59 AM IST

Economic Survey : मुख्य आर्थिक सल्लागार समितीच्या नेतृत्त्वाखाली बजेटपूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला जातो. या समितीचे अध्यक्ष अनंत नागेश्वर यांच्या समवेत अर्थतज्ज्ञांची एक टीम कार्यरत असते

Economic Survey 2023 HT
Economic Survey 2023 HT

Economic Survey : आज सकाळी ११ वाजचा संसदेचे बजेट सत्र सुरु होत आहे. सेंट्रल हाॅलमध्ये दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती दौपदी मुर्मू संबोधित करतील. यानंतर लगेचच २०२२-२३ आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री ते सादर करतील. त्यानंतर लगेचच मुख्य आर्थिक सल्लागार वी अनंतर नागेश्वरन प्रेस काॅन्फरन्स घेणार आहेत.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात काय असते

अर्थव्यवस्थेची स्थिती देण्यासाठी आणि धोरणांसंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी बजेटच्या आधी संसदेत आर्थिक समिक्षा सादर केली जाते. आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला जातो. याद्वारे सरकार योजनांची स्थिती, संपूर्ण वर्षभरातील विकासाचा कल, कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली याची माहिती दिली जाते. बजेटच्या आधी एक दिवस जाहीर होणाऱ्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात सर्वांची नजर प्रामुख्याने जीडीपीच्या आकडेवारीवर असते.

इथे लाईव्ह पहा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल

सर्वसामान्य आम आदमीलाही आर्थिक सर्वेक्षण अहवाल लाईव्ह पाहता येणार आहे. याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सर्वच न्यूज चॅनेल्सवर पाहता येईल. पण त्याशिवाय संसद टीव्ही, पीआयबी इंडिया आदीवर केले जाईल. तुम्हाला हे सर्वेक्षण पहायचे असेल तर https://www.youtube.com/@pibindia/videos केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/finmin.goi ट्विटर लाईव्ह अपडेट https://twitter.com/FinMinIndia वर पाहता येईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग