मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price : सोने किंचित महागले, चांदीच्या दरात मात्र घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price : सोने किंचित महागले, चांदीच्या दरात मात्र घसरण; जाणून घ्या आजचे दर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 25, 2024 01:26 PM IST

Gold Silver Rate Today : लगीनसराईचा शेवटचा टप्पा सुरू झाला असतानाही सोने व चांदीच्या किंमतीत चढउतार सुरूच आहे. आज सोनं किंचित महागलं असून चांदी किंचित स्वस्त झाली आहे.

सोने, चांदीच्या दरात किंचित बदल; जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीच्या दरात किंचित बदल; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : लगीनसराई सुरू झाल्यापासून रोजच्या रोज भाव खाणाऱ्या सोने आणि चांदीच्या भावात आज देखील काही प्रमाणात बदल झाला आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोनं एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) अवघ्या १५ रुपयांनी महागलं असून त्याचा भाव ७१८४१ रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदी किलोमागे १११ रुपयांनी स्वस्त होऊन ८०५७६ रुपये झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) च्या नव्या दरानुसार, गुरुवार २५ एप्रिल रोजी २३ ​​कॅरेट सोनं १५ रुपयांनी महागलं आणि तोळ्यामागे ७१५५३ रुपयांवर पोहोचलं आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १३ रुपयांनी वाढला असून तो ६५८०६ रुपयांवर पोहोचला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दरही आज ११ रुपयांनी वाढून ५३८८१ रुपयांवर पोहोचला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ९ रुपयांनी वाढून ४२०२७ रुपयांवर पोहोचला आहे.

रेकॉर्ड ब्रेक एप्रिल

१ एप्रिल रोजी सोन्यानं प्रति १० ग्रॅम ६८९६४ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

३ एप्रिल रोजी हाच दर ६९५२६ रुपयांवर पोहोचला.

४ एप्रिल रोजी सोन्याच्या दरानं ६९९३६ चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला.

८ एप्रिल रोजी सोनं ७१२७९ रुपयांवर पोहोचलं.

९ एप्रिल रोजी ७१५०७ रुपयांचा नवा उच्चांक गाठला.

१२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव ७३८३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला.

१९ एप्रिल रोजी आणखी एक उच्चांक नोंदवत सोन्याचा भाव ७३५९६ रुपये झाला.

का वाढतोय सोन्याचा दर?

सोन्याचा भाव वाढण्यामागे कोणताही एक घटक कारणीभूत नसतो. अनेक घटकांचा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. त्यात देशांतर्गत सोन्याची मागणी हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. गेल्या काही दिवसांपासून लगीनसराई सुरू आहे. त्यामुळं सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगभरच्या केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी सुरूच ठेवली आहे. सलग नवव्या महिन्यात केंद्रीय बँकांकडील सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. हेही एक कारण भाववाढीमागे आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात देण्यात आलेले सोने आणि चांदीचे दर IBJA नं जारी केले आहेत. या दरामध्ये जीएसटी आणि दागिने बनवण्याच्या शुल्काचा समावेश नाही. त्यामुळं तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या प्रत्यक्ष किमतीमध्ये १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.)

WhatsApp channel

विभाग