मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Airtel Stocks : ८७० रुपयांपर्यंत जाऊ शकतो एअरटेलचा स्टाॅक, लगेच खरेदी करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Airtel Stocks : ८७० रुपयांपर्यंत जाऊ शकतो एअरटेलचा स्टाॅक, लगेच खरेदी करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 20, 2023 04:02 PM IST

Airtel Stocks : ३० पैकी २३ तज्ज्ञांनी एअरटेलचा शेअऱ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यातील १० तज्ज्ञांनी स्ट्राँग बाय रेटिंग दिले आहे. ५ तज्ज्ञांनी शेअर विकण्याचा आणि दोघांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

Airtel 5 G HT
Airtel 5 G HT

Airtel Stocks : ३० पैकी २३ तज्ज्ञांनी एअरटेलचा शेअऱ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यातील १० तज्ज्ञांनी स्ट्राँग बाय रेटिंग दिले आहे. ५ तज्ज्ञांनी शेअर विकण्याचा आणि दोघांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना ५ टक्के नकारात्मक परतावा देणारा भारती एअरटेलच्या शेअऱसंदर्भात तज्ज्ञ बुलिश आहेत. हा स्टाॅक या आठवड्यात ८७० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. गोल्डमॅन सॅशने या टार्गेट प्राईससह हा स्टाॅक खरेदीचा सल्ला दिला आहे.

याशिवाय ३० तज्ज्ञांपैकी २३ जणांनी एअरटेल स्टाॅक खरेदीचा सल्ला दिला आहे. यातील १० जणांी स्ट्राॅग बाय रेटिंग्ज दिले आहेत. तर ५ जणांनी शेअर्स विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. तर दोन जणांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. भारती एअरटेलच्या शेअर प्राईस हिस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाले तर, गेल्या एका महिन्यात १.६४ टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या वर्षभरात कंपनीने १० टक्के वाढ संपादन केली आहे. या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक ८६०.५५ रुपये आणि निचांक ६२८.७५ रुपये आहे.

ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियलने भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि ९४० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, कंपनीला निरोगी एआरपीयू वाढ आणि मजबूत ४ जी अपग्रेडचा फायदा होईल. ईबीआयटीडीए मार्जिन सुधारत आहे. व्यवस्थापनाचे लक्ष एआरपीयू वाढवण्यावर आहे. भविष्यात आणखी काही दरवाढ दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून ९८५ रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्याच्या ७७५ रुपयांच्या किंमतीनुसार, स्टॉकला २७ टक्के परतावा मिळू शकतो. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, मर्यादित दरवाढ आणि ४जी मध्ये नवीन ग्राहकांची संथ वाढ यामुळे नजीकच्या काळात कंपनीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, कंपनीचा ५ जी आणि ग्रामीण कव्हरेजवरील खर्च देखील वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कॅपेक्स २१ टक्क्यांनी ३५९०० कोटींपर्यंत वाढू शकतो. तथापि, हे सर्व घटक स्थिर झाल्यानंतर, कंपनीचा वाढीचा दृष्टीकोन अधिक चांगला दिसतो. बाजाराचा हिस्सा वाढला आहे, तर एआरपीयूमध्येही सुधारणा झाली आहे. स्टॉक भविष्यात चांगला परतावा देऊ शकतो.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग