मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bank holidays : मार्च महिन्यात बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार, आत्ताच पाहून घ्या तारखा!

bank holidays : मार्च महिन्यात बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार, आत्ताच पाहून घ्या तारखा!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 01, 2023 12:16 PM IST

bank holidays in march 2023 : मार्चमध्ये होळी आणि रामनवमीसह अनेक सण साजरे केले जातात. त्याशिवाय दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार असे धरुन १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.

bank holidays in march 2023 HT
bank holidays in march 2023 HT

bank holidays in march 2023 : आजपासून मार्च महिना सुरु झाला आहे. या संपूर्ण महिन्यात बँकांच्या संदर्भात कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते पटापट पूर्ण करावे लागतील. कारण मार्चमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

मार्चमध्ये होळी, रामनवमीसह अनेक सण साजरे केले जातात. त्याशिवाय राज्यनिहाय सुट्ट्याही असतात. अशा प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवते आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा उल्लेख नसतो.

नेटबँकिंगच्या माध्यमातूनही व्यवहार करता येणार

मार्चमध्ये बँका १२ दिवस राहणार आहेत. पण या दिवसात बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करणे शक्य होणार नाही. मात्र नेट बँकिंग, मोबाईल बँकिंच्या माध्यमातूनही व्यवहार करता येतील. बँकांमध्ये या सुविधा २४ तास सुरू असणार आहेत. मात्र, एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता भासू शकते.

अशा आहेत सुट्ट्या

३ मार्च (शुक्रवार) - चपचार कुट - मिझोराममध्ये बँका बंद राहतील

५ मार्च - रविवारी बँका बंद राहतील

७ मार्च (मंगळवार) - होळी / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा - महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगणा आणि झारखंडमध्ये बँका बंद आहेत.

८ मार्च (बुधवार) - होळी / होळी २रा दिवस - धुलेती / याओसांग दुसरा दिवस: त्रिपुरा, गुजरात, मिझोरम, मध्यप्रदेश, ओडिसा, चंदीगड, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बेंगा येथे बँका बंद राहतील

९ मार्च - गुरुवार - (होळी) - बिहारमध्ये बँका बंद राहतील

११ मार्च - महिन्याचा दुसरा शनिवार

१२ मार्च - रविवार

१९ मार्च - रविवार

२२ मार्च - (बुधवार) - गुढी पाडवा / उगादी सण / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा (चेरोबा) / तेलुगु नववर्ष दिन / पहिला नवरात्र - महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, गोवा, बिहार आणि श्रीनगर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

२५ मार्च - चौथा रविवार

२६ मार्च - रविवार

३० मार्च - श्री राम नवमी

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग