मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Effect of 2000 noteban on Share market : २००० रुपयांच्या नोटबंदीचा शेअर बाजारावर कसा होणार परिणाम, जाणून घ्या

Effect of 2000 noteban on Share market : २००० रुपयांच्या नोटबंदीचा शेअर बाजारावर कसा होणार परिणाम, जाणून घ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 22, 2023 08:52 AM IST

Effect of 2000 noteban on Share market : रिझर्व्ह बँकेने आज २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा आदेश जारी केला आहे. जर कोणाकडे २००० रुपयांची नोट असेल तर तो ३० सप्टेंबरपर्यंत बदलू शकतो. या निर्णयाचा शेअर बाजारावर परिणाम होईल का, येथे जाणून घेऊया.

2000 noteban HT
2000 noteban HT

Effect of 2000 noteban on Share market : आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०१८ पर्यंत ६.७३ लाख कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा चलनात होत्या. जारी केलेल्या एकूण नोटांच्या हे प्रमाण सुमारे ३७.३ टक्के होते. पण त्याच वेळी ३१ मार्च २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटांचा हिस्सा १०.८ टक्क्यांवर आला होता. मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर ते अंदाजे ३.६२ लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच २००० रुपयांच्या नोटांचे चलन सातत्याने कमी होत आहे.

आरबीआयने २००० रुपयांची नोट बदलण्यासाठी बराच वेळ दिला आहे, तिथे ती बदलण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे. अशा स्थितीत त्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळेच यावेळी आरबीआयच्या या निर्णयाचा शेअर बाजाराच्या व्यवसायावर परिणाम होणार नसल्याचे मानले जात आहे. काही प्रमाणात मानसिक परिणाम होऊ शकतात. तरीही स्टॉक ट्रेडिंग बहुतांशी ऑनलाइन पद्धतीने होतात. त्यामुळे कोणताही परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

शेअर बाजाराचे स्वतंत्र बाजार विश्लेषक अंबरीश बालिगा यांच्या मते, लोक साधारणपणे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंट सुविधा वापरत आहेत. त्यामुळे २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीसारखा परिणाम यंदाच्या वेळी दिसणार नाही. दुसरीकडे, वेल्थमिल्स सिक्यूरिटीजच्या इक्विटी स्ट्रॅटेजी विभागाच्या क्रांती बाथिनी यांच्या मते, या निर्णयाचा शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण २००० रुपयांच्या नोटांचे चलन आधीच कमी आहे. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवहार जलद आणि सुलभ होत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग