Adani stocks : अदानी समुहातील शेअर्सवर सध्या गुंतवणूकदारांचे काटेकोर लक्ष आहे. आज त्यापैकीच अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन या ३ कंपन्यांच्या स्टाॅक्समध्ये मंगळवारी अप्पर सर्किट लागले. गौतम अदानींचा कोणता निर्णय़ या कंपन्यांना फलदायी ठरला, पाहा.
अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स तीन शेअर्ससहित फोकसमध्ये आहेत.अदानी ट्रान्समिशन (१०१३.५५ रुपये), अदानी टोटल (९३५.३५ रुपये), अदानी ग्रीन एनर्जी (९३०.७५ रुपये) या कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आहेत. तर अदानी एन्टरप्राईज, अदानी पावर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही, एसीसी, अंबुजा सिमेंट, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनाॅमिक झोनचे शेअर्स आज ४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
वास्तविक अदानी समुहाने सोमवारी कर्ज पूर्नखरेदी कार्यक्रम सुरु केला. यावर्षी हिडेनबर्गचा झटका पचवून कंपनीने पहिल्यांदा कर्ज पूर्नखरेदी सुरु केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एपीएसईझेडने आपल्या जुलै २०२४ च्या बाँन्डच्या १३ कोटी डाॅलर्सपर्यंत कर्ज पूर्नखऱेदीसाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. आपली आर्थिक स्थिती मजबूत करुन गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
हिडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारीला जाहीर झाल्यानंतर समुहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधडा खाली कोसळले. हिडेनबर्गच्या आरोपाचे अदानी समुहाने खंडन केले होते.
संबंधित बातम्या