कर्क रास
प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. पत्नी जोडदार नोकरीत असेल तर बढतीचे योग आहेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. आरोग्य ठीक राहणार आहे. आज आपणास अपेक्षित यश लाभणार आहे. नव्या संधीचा फायदा होईल.
शुभरंग: पिवळसर
कन्या रास
परदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. दुरच्या प्रवासातून लाभ होतील. आज नोकरीत कामाचा विस्तार वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. चैनीच्या वस्तु खरेदी कडे मन झुकेल. दिनमान उत्तम राहिल.
शुभरंगः हिरवा
वृश्चिक रास
आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. लाभदायक दिवस आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. नोकरी रोजगारात बदल घडवतील.कामातील बदल आकर्षक ठरतील. व्यापारात यश मिळणार आहे.प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आज लाभदायक दिवस आहे.
शुभरंगः तांबूस
कुंभ रास
अचानक लाभाच्या संधी समोर येतील. प्रवास घडतील मात्र ते लाभ देणारे ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल.यश व उत्साह वाढणार आहे.विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. आज आपण केलेल्या कामाची सुरुवात चांगली होईल. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: जांभळा