मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs Today 17 March 2023 : हातून लेखनकार्य घडेल, समाजात मानसन्मान वाढेल
आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Lucky Zodiac Signs Today 17 March 2023 : हातून लेखनकार्य घडेल, समाजात मानसन्मान वाढेल

17 March 2023, 6:18 ISTDilip Ramchandra Vaze

Today Lucky Zodiacs : अचानक धनलाभ होणार आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर समाधान लाभणार आहे. दोन्ही भागीदार तुम्हाला अपेक्षित साथ देतील, त्यामुळे आनंदी असाल.

राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज शुक्रवार १७ मार्च २०२३. आजच्या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया.

ट्रेंडिंग न्यूज

मेष रास

आज तुमचा वैवाहिक भागीदार आणि व्यावसायिक भागीदार या दोघांचीही उत्तम साथ मिळेल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात फायदा संभवतो. अचानक धनलाभ होईल, त्यामुळे मूड आनंदी असेल. नोकरीत आज आपल्या खालच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करावे लागेल. नोकरीत काही बदलाचे संकेतही आहेत. 

शुभरंग: तांबूस

 

सिंह रास

मनासारख्या घटना घडतील. कौटुंबिक पातळीवरही आनंदी आणि समाधानी असाल.मनाजोगी कामं करता येतील. भावंड सहकार्य करतील. घरात धार्मिक कार्य मंगलकार्य होईल.आनंदाचं, प्रसन्न वातावरण राहील. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. संततीकडून सुख समाधान लाभेल.समाजात मानसन्मान वाढेल. पत्नीच्या बढतीचे योग आहेत.

शुभरंग: लाल

 

धनु रास

घरात धार्मिक कार्य घडतील.मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातून धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. अत्यंत शुभ आणि फलदायी दिनमान आहे. सार्वजनिक कामातही भाग घ्याल. नातेवाईक आर्थिक सहकार्य करतील. कलासक्त आज साहित्यात काहीतरी भरीव योगदान देतील.

शुभरंग: पिवळसर 

 

मकर रास 

वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन-घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. 

शुभरंग: जांभळा

 

विभाग