मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope today 14 March 2023 : कोणत्या राशींना होणार धनलाभ ; वाचा राशिभविष्य !

Horoscope today 14 March 2023 : कोणत्या राशींना होणार धनलाभ ; वाचा राशिभविष्य !

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2023 05:58 AM IST

Rashi Bhavishya Today 14 March 2023 : अनेक राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील.

Horoscope Today
Horoscope Today

मेष: आजच चंद्रभ्रमणात पाहता स्वतःच्या मनाने विवेकाने निर्णय घेतल्यास यश मिळेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत हितशत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. व्यापारिक जबाबदारी देणे घेणे सीमीत ठेवा. आर्थिक स्थिती मध्यम राहील. अनिष्ट स्वरूपाचे दिनमान राहील. थकित रक्कम मिळण्यास विलंब होईल. कामकाजात प्रगतीचे योग जुळून येण्यास अडचण जाणवेल. केलेल्या कामाचे फळ मिळणे कठीण वाटत. व्यापारात नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वाईट सवयीपासून दूर राहा. उत्तेजित पणावर संयम राखावा. व्यसनापासून दूर रहा. मोठे व्यवहार टाळावेत.

ट्रेंडिंग न्यूज

शुभरंग: सफेद शुभदिशा: पश्चिम.

वृषभः आज अनिष्ट स्वरुपाचं दिनमान आहे. रोजगारात ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात अनिश्चितता राहील. कामात झालेल्या बदलांमुळे ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवसायात उतविळपणामुळे नुकसान होईल. मुलाशी वाद निर्माण होतील.कौंटुबिक वैयक्तिक जीवनात सावध राहा. कामकाजान मनाजोगे समाधान लाभणार नाही. मनावर संयम ठेवा. पत्निचा आरोग्याबाबतीत तक्रारी होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण

मिथुन: आज महत्वाच्या कामा संदर्भात जपुनच निर्णय घ्यावा. मतभेद व वादांना टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रमैत्रिणींकडून आप्तेष्ट नातेवाईकांकडून आज विशेष सहकार्य लाभणार आहे. आपल्या पराक्रमी वृत्तीमुळे आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या अपेक्षा जास्त राहतील. कोणाचाही तिरस्कार करू नका. व्यापार व्यवसाय चांगला राहील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील. प्रेमसंबंधात दृढ विश्वास निर्माण होईल. प्रेमीयुगुलामध्ये स्नेह वाढेल. व्यापारात नवीन योजनाची सुरुवात कराल. मन समाधानी राहिल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील.

शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.

कर्क: आज स्वभावात चिडचिडपणा व राग उत्पन्न होईल. शांत राहण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. धावपळ व धगधग वाटेल. संयम कमी होऊ शकतो.मनोबल संभाळा. नातेवाईकांसोबत कलहाचं वातावरण निर्माण होण्याचे प्रसंग उद्‌भवतील. शैक्षणिक कामात अडथळे निर्माण होतील. कुटुंबापासुन कामानिमित्त दुर जावे लागेल. व्यापार-व्यवसायात अनावश्यक खर्च वाढणार आहे. नोकरीत कामाच्या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश पीडादायक दिनमान असल्याने कौटुंबिक वादविवाद टाळा.

शुभरंग: पिवळसर शुभदिशा: वायव्य.

सिंह: आज आकस्मिक धनलाभ होईल. दिवस उत्तम राहील. नोकरीत धाडसी व घडाडीचे निर्णय घ्याल. यश मिळेल. राजकीय सामाजिक कार्याबद्दल उत्तम दिनमान आहे. पतप्रतिष्ठा वाढेल. आपले प्रयत्न यशस्वी होतील. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व्यापार-व्यवसायात नफ्यात वाढ होऊन अनपेक्षित लाभ होईल. नवीन व्यापाराची योजना पुर्णत्वास जाईल. भागीदाराची साथ मिळेल. पत्नीकडून उत्तम सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहिल. परमेश्वराविषयी विश्वास वाढेल. कर्तृत्वात वाढ होऊन स्वतःला सिद्ध कराल.

शुभरंग: लाल शुभदिशा:पूर्व.

कन्या: आज अनपेक्षित संघी व लाभ मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील. शासकीय रखडलेली कामे मार्गी लागतील. वाईट संगती व सवयीपासुन मात्र दुर राहा. हावरटपणा करू नका. अविचारी गुंतवणूक करू नका.विचाराअंती निर्णय घ्या.

शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.

तुला: आज काहीसा संमिश्र फल देणारा दिवस आहे. वाणीवर संयम राखा. कामाच्या ठिकाणी गैरसमज वाढतील. उत्पनातून मन समाधानी राहणार नाही. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यावसायिकांनी मोठे व्यवहार टाळावेत. खरेदीविक्रीचे व्यवहार करू नये. काही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. मुलांना आरोग्याच्या तक्रारी उद्भभवू शकतात. स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीवर लक्ष द्या.

शुभरंग: सफेद शुभदिशाः वायव्य.

वृश्चिक: आज आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. जामीन राहू नका. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणार दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. व्यापारात बदलाचे मोठे निर्णय घेऊ नयेत.मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक बाबतीत चिंता निर्माण होईल. कायदेशीर प्रकरणात गुंतले जाल. नुकसानीची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करा. शक्यतो प्रवास टाळावेत.

शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

धनु: आज आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. केंद्र स्थानातील गुरूमुळे आध्यात्मिक, देवी सुखशांती अनुभवाल. तिर्थक्षेत्री यात्रा कराल. नोकरी-व्यापारात प्रगतीकारक योग आहे. आपले निर्णय अचूक ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल. मनाला शांती लाभेल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन अथवा प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक परिणाम दिसतील. आजचा दिवसाचा लाभ घ्या.प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.

शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.

मकर : आजचं दिनमान उत्तम राहिल.अतिउत्साहीपणा मात्र टाळा. स्वःतावर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. शासकीय कर्मचारी असाल तर महत्वाचे निर्णय आज घ्याल. व्यवसायात मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. मित्र नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढल्याने मानसिक दृष्ट्या थकवा जाणवेल. स्वतःच्या प्रकृती कडे मात्र लक्ष द्या. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री प्रवास होईल.प्रवासातून लाभ होतील.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

कुंभ: आज भाग्यदायक दिवस आहे. दिवस शुभ सकारात्मतेत वाढ करणारा आहे. आत्मविश्वास द्विगुणित राहील. शुभसंदेश ऐकायला मिळतील. नोकरीतील बदल लाभदायक ठरणार आहे. नवीन नोकरीत मुलाखतीत यश येईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करीत असल्यास बढतीचे योग आहेत. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्याभ्यासात प्रगती राहिल. पत्नीच्या मनाजोगे निर्णय घ्याल. संशोधन, साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान प्राप्त होईल. आरोग्य उत्तम राहिल. शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.

मीन: आज शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावा. प्रकृती स्वास्थ अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास जाणवेल. कामात अतितणाव निर्माण होईल. व्यापारात जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत. कौटुंबिक जीवनात चिंताग्रस्त वातावरण राहिल. आर्थिक खर्चाच्या बाजुत वाढ होईल. आज कामात व्यस्त राहाल. आरोग्याच्या बाबतीत काही आजार आणि वेदना उद्‌भवतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. आज जोखिमीची कामे स्विकारू नका. वाहन सावकाश चालवा. अपघात भय संभवते.न

शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel