मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ganga Dussehra 2023 : गंगा दशहरा समाप्तीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा दान

Ganga Dussehra 2023 : गंगा दशहरा समाप्तीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा दान

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 29, 2023 10:26 AM IST

Shubh Muhurta On Ganga Dussehra 2023 : भगीरथाचे अविरत प्रयत्न आणि त्याद्वारे माता गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा गंगा दशहरा दिवस ३० मे २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे.

गंगा दशहरा
गंगा दशहरा (HT)

भगीरथाचे अविरत प्रयत्न आणि त्याद्वारे माता गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा गंगा दशहरा दिवस ३० मे २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. यंदाचा गंगा दशहरा तीन योगात साजरा होणार आहे. ३० मे रोजी रवियोग, सिद्धी योग आणि धन योग तयार होत आहेत. महत्वाचं म्हणजे याच दिवशी शुक्र मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

गंगा दशहराचे शुभ मुहूर्त कोणते?

यावेळी गंगा दशहरा २९ मे रोजी सकाळी ११.४९ रोजी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० मे रोजी दुपारी ०१ वाजून ०७ मिनिटांनी समाप्त होईल. गंगा दशहर्‍याच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रवियोग आणि सिद्धी योग यांचा संयोग होणार आहे.

गंगा दशहर्‍याच्या दिवशी करा तुमच्या राशीनुसार दान

मेष

गंगा दशहर्‍याच्या दिवशी तीळ दान करणे मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे.

वृषभ

गंगा दशहर्‍याच्या शुभ दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गरिबांना धान्य दान करावे किंवा अन्नदान करावे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी पाणपोई लावावी ते शक्य नसेल तर गरजेच्या ठिकाणी पाणी दान करावे, ते शुभ आणि फलदायी असेल.

कर्क

गंगा दशहर्‍याच्या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींनी पिवळी फळं दान करणे चांगले मानले गेले आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना गंगा दशहर्‍याच्या दिवशी फळे, तांब्याची भांडी दान करणे खूप शुभ आणि फलदायी ठरेल, सिंह राशीच्या व्यक्तींची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी बेलपत्र दान करावे. याने तुम्हाला माता गंगेसोबत भगवान शिवाची कृपा देखील मिळेल आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल.

तूळ

गंगा दसर्‍याच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी सात प्रकारचे धान्य दान करणे शुभ राहील.

वृश्चिक

गंगा दशहऱ्याच्या दिवशी त्या हंगामात उपलब्ध असलेली फळं दान करणे चांगले राहील, यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल.

धनु

धनु राशीच्या लोकांनी या दिवशी तिळाचे दान करावे, ते फलदायी ठरेल.

मकर

मकर राशीच्या लोकांनी या दिवशी मातीच्या वस्तू दान कराव्यात, असं केल्यास त्यांना चांगली बातमी मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी गंगा दसर्‍याच्या दिवशी गरजूंना अन्नधान्य दान करावे, ते तुमच्यासाठी चांगले राहील.

मीन

या राशीच्या लोकांनी पाण्याचे दान करणे चांगले राहील. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग