मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final साठी महान खेळाडूनं निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या दिग्गज ऑलराऊंडरला वगळलं, पाहा

WTC Final साठी महान खेळाडूनं निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या दिग्गज ऑलराऊंडरला वगळलं, पाहा

Jun 03, 2023, 10:34 AM IST

    • indian playing 11 for wtc final 2023 : WTC Final पूर्वी अनेक क्रिकेट तज्ञ आपली मते मांडत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या सामन्यासाठी त्यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी यांनीदेखील भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.
indian playing 11 for wtc final

indian playing 11 for wtc final 2023 : WTC Final पूर्वी अनेक क्रिकेट तज्ञ आपली मते मांडत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या सामन्यासाठी त्यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी यांनीदेखील भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

    • indian playing 11 for wtc final 2023 : WTC Final पूर्वी अनेक क्रिकेट तज्ञ आपली मते मांडत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या सामन्यासाठी त्यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी यांनीदेखील भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

wtc final 2023 tom moody indian playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून रंगणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. WTC Final जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, तसे पाहता इंग्लिश कंडिशन्समध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

मात्र, WTC Final पूर्वी, अनेक क्रिकेट तज्ञ आणि माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या सामन्यासाठी त्यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी यांनीदेखील भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने फिरकीपटूंऐवजी वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे.

टॉप ऑर्डरमध्ये कोण-कोण?

एका स्पोर्टस चॅनलवर बोलताना टॉम मूडी यांनी आपला संघ निवडला. त्यांनी रोहित शर्मा आणि शुभमन गिलसह भारतीय प्लेइंग इलेव्हनची सुरुवात केली. यानंतर मुडी यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

टॉम मूडी यांनी विराट कोहलीलीला चौथा क्रमांक दिला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आयपीएल २०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसणाऱ्या अजिंक्य रहाणेला स्थान दिले आहे. त्याचवेळी केएस भरतची यष्टिरक्षक म्हणून निवड केली. इशान किशनच्या जागी टॉम मूडीने केएस भरतला संधी दिली.

फक्त एका फिरकीपटूला स्थान

टॉम मूडी यांनी आपल्या संघात एकच फिरकी गोलंदाज निवडला. त्यांनी रवींद्र जडेजाला स्थान दिले आहे. जडेजा महान अष्टपैलू खेळाडू आहे. अशा परिस्थितीत तो संघासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. जडेजा खालच्या क्रमांकावर फंलदाजीची धुरा सांभाळू शकतो.

चार वेगवान गोलंदाजांची निवड

टॉम मूडी यांनी आपल्या संघात ४ वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसह उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली. शार्दुल फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही संघाला योगदान देऊ शकतो. विशेष म्हणजे मुडी यांनी आपल्या संघात अश्विनला संधी दिली नाही.

टॉम मूडी यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.