मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO : मैदानात घुसलेल्या चाहत्याची गार्डने केली धुलाई, पण शमीनं हे काय केलं? पाहा

VIDEO : मैदानात घुसलेल्या चाहत्याची गार्डने केली धुलाई, पण शमीनं हे काय केलं? पाहा

Feb 17, 2023, 02:25 PM IST

    • India vs Australia (IND vs AUS) 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली कसोटी सामन्यात एका चाहत्याने मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्, वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. यावेळी मोहम्मद शमीने एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 
India vs Australia (IND vs AUS) 2nd Test

India vs Australia (IND vs AUS) 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली कसोटी सामन्यात एका चाहत्याने मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्, वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. यावेळी मोहम्मद शमीने एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

    • India vs Australia (IND vs AUS) 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली कसोटी सामन्यात एका चाहत्याने मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्, वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. यावेळी मोहम्मद शमीने एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू आहे. या दरम्यान दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरु असताना एक चाहता भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात घुसला पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान सीमारेषेवर उभ्या असलेल्या मोहम्मद शमीने गार्डला तसे न करण्यास सांगितले आणि चाहत्याला सोडून देण्याचा इशारा केला.

ऑस्ट्रेलियन संघातील मधळ्या फळीची निराशाजनक कामगिरी

दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. यानंतर मोहम्मद शमीने १५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर वॉर्नरला आपला शिकार बनवले. त्याचवेळी रविचंद्रन अश्विनने त्याच षटकात मार्निश लबुशेन आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवून कांगारू संघाला २ मोठे धक्के दिले.

यानंतर हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद १९० धावा झाल्या आहेत. पॅट कमिन्स १५ आणि पीटर हँड्सकॉम्ब ३५ धावांवर खेळत आहेत.

पुजाराचा १०० वा कसोटी सामना

चेतेश्वर पुजारासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज (१७ फेब्रुवारी) त्याच्या करिअरचा १०० वा (Cheteshwar Pujara 100th test match) कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला आहे. भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारा पुजारा १३वा भारतीय खेळाडू ठरला. या विशेष कामगिरीसाठी सामना सुरू होण्यापूर्वी पुजाराचा गौरव करण्यात आला. सुनील गावस्कर यांनी पुजाराच्या सन्मानार्थ छोटेसे भाषणही केले. यावेळी चेतेश्वर पुजाराचे कुटुंबीय त्याच्यासोबत उपस्थित होते.

त्याचवेळी, भारतीय संघाने दिल्ली कसोटीसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे.