मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  CWG 2022: कॉमनवेल्थमध्ये महाराष्ट्राच्या 'या' ७ जणांनी केली पदकांची कमाई, फोटो पाहा

CWG 2022: कॉमनवेल्थमध्ये महाराष्ट्राच्या 'या' ७ जणांनी केली पदकांची कमाई, फोटो पाहा

Aug 10, 2022, 02:51 PMIST

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ संपले आहेत. यावेळी भारताला एकूण ६१ पदके मिळाली . यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे.कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा पंजाब आणि हरियाणाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या दोन राज्यांतील खेळाडूंनीच देशाला ७३ टक्के पदके मिळवून दिली आहेत. या खेळांमध्ये महाराष्ट्राच्या १४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ ७ खेळाडूंनाच पदकांची कमाई करता आली आहे.

  • कॉमनवेल्थ गेम्स २०२२ संपले आहेत. यावेळी भारताला एकूण ६१ पदके मिळाली . यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे.कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा पंजाब आणि हरियाणाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या दोन राज्यांतील खेळाडूंनीच देशाला ७३ टक्के पदके मिळवून दिली आहेत. या खेळांमध्ये महाराष्ट्राच्या १४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ ७ खेळाडूंनाच पदकांची कमाई करता आली आहे.
सांगलीच्या संकेत सरगरने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं होतं. वेटलिफ्टर संकेत सरगरने ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं.
(1 / 8)

बीडच्या अविनाश साबळे यानं ३ हजार मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावलं आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 'स्टिपल चेस' खेळात आतापर्यंत भारताला मिळालेलं हे पहिलवहिलं पदक आहे.
(2 / 8)

मुंबईच्या चिराग शेट्टीने सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या साथीने बॅडिमंटन दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. दोघांनी अंतिम लढतीत इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन मेंडी यांना सरळ गेममध्ये २१-१५, २१-१३ असे पराभूत केले.
(3 / 8)

 मुंबईच्या सनिल शेट्टीचा टेबल टेनिसच्या संघात समावेश होता. टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने सुवर्णपदक पटकावले. फायनलमध्ये भारताने सिंगापूरला ३-१ ने पराभूत केलं.
(4 / 8)

मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जचा भारताच्या महिला क्रिकेट संघात समावेश होता. या संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे महिला संघाच्या पदरात रौप्य पदक पडले. जेमीने स्पर्धेत बार्बाडोस आणि इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी केली.
(5 / 8)

सांगलीच्या स्मृती मानधनानेही कॉमनवेल्थ गेम्समध्ये शानदार कामगिरी केली. तिने पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. मात्र, ती फानलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लवकर बाद झाली.
(6 / 8)

मुंबईतील कांदिवलीच्या राधा यादव हिचाही भारताच्या महिला क्रिकेट संघात समावेश होता. ऑलराऊंडर राधाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तिने फायनलमध्ये एक उत्कृष्ट झेल टिपला होता. तसेच एक अप्रतिम रनआऊटही केला होता.
(7 / 8)

महाराष्ट्रातील पदकवीर
(8 / 8)
महाराष्ट्रातील पदकवीर

    शेअर करा